By  
on  

मराठी बिग बॉसच्या विजेतेपदाला शिव ठाकरेला झाले एक वर्ष पूर्ण, असं केलं सेलिब्रेशन

मराठी बिग बॉसच्या यशस्वी पहिल्या पर्वानंतर मागील वर्षी या कार्यक्रमाचं दुसरं पर्वही आलं. या दुसऱ्या पर्वाचा विजेता ठरला शिव ठाकरे. रोडीज या रिएलिटी शोमध्ये चर्चेत आलेल्या शिवला बिग बॉस मराठी कार्यक्रमातून मोठा चाहतावर्ग मिळाला. बिग बॉस मराठीचा विजेता म्हणून शिव प्रचंड लोकप्रिय ठरला आहे. बिग बॉसच्या घरातील त्याचा वावर, त्याची वागणुक पाहता तो महाराष्ट्राचा लाडका स्पर्धक ठरला.

शिव ठाकरेच्या याच विजयाला नुकतच एक वर्ष पूर्ण झालं आहे. या निमित्ताने शिवच्या परिवार आणि मित्रमंडळींनी मिळून खास सेलिब्रेशन केलं आहे. शिवने या सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#1yearofBiggBoss #Celebration #Winning #love Thank you all for your unconditional love.Your support and encouragement have always been the driving factors in my life... So Always be with me in my journey towards the dream... Ganpati Bappa morya ️ आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार आपण दिलेली मोलाची साथ आणि प्रेमाचा मी अखंड ऋणी राहील.असेच आपले प्रेम, सदिच्छा, शुभेच्छा आणि साथ निरंतर राहो अशी आशा बाळगतो आणि मानापासून आभार मानतो. (Speacial Heartily Thanks To these Mentors without whom this journey would have not been possible as they had conviction In me and because of them I am here @deborah.polycarp @beingpunty bhai️ always thankful) Video credit: @shivtej_s_deshmukh Thank You Brother for The wonderful Video thanks bhai @shubzthakare007 #family #tumchaaplamanus #Bbmarathi2#bigboss (Special Thanks @endemolshineind @colorsmarathiofficial @sandesh_ghuge_ @anandchavan41 @tushar @saneness_ @mtvroadies @mtvindia )

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9) on

 

या व्हिडीओत शिव केक कापून बिग बॉसच्या ट्रॉफीसोबत सेलिब्रेशन करताना दिसतोय. चाहत्यांनी आत्तापर्यंत दिलेली साथ शिवसाठी मोलाची असल्याचं म्हणत शिव या व्हिडीओतून चाहत्यांचे आभार मानतोय. शिवाय तो या पोस्टमध्ये लिहीतो की, "आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. आपण दिलेली मोलाची साथ आणि प्रेमाचा मी अखंड ऋणी राहील.असेच आपले प्रेम, सदिच्छा, शुभेच्छा आणि साथ निरंतर राहो अशी आशा बाळगतो आणि मानापासून आभार मानतो."

Author

Recommended

PeepingMoon Exclusive