गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश भक्तांसाठी खास मालिका भेटीला आली. 'जय देवा श्री गणेशा' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. अवघ्या अकरा भागांची ही मालिका प्रेक्षकांना चांगलीच भावली. या मालिकेतून गणरायाची कथा दाखवण्यात आली. गणपती बाप्पाच्या जन्मापासून ते त्यांच्या लग्नापर्यंतची गोष्ट या मालिकेत दाखवण्यात आली.
नुकतच या मालिकेचे अकरा भाग पूर्ण झाले असून या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशी सगळ्या कलाकारांनी मिळून यावेळी सेलिब्रेशन केलं.
मालिकेच्या चित्रीकरणाचा हा शेवटचा दिवस कलाकारांनी एकत्र मिळून साजरा केला आहे.
या मालिकेत देवी पार्वतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री भाग्यश्री मोटेने या मालिकेच्या सेटवरील शेवटच्या दिवसाचे काही फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. शिवाय या मालिकेच्या सेटवरील काही खास आठवणी देखील भाग्यत्रीने पोस्ट केल्या आहेत.
या फोटोंमध्ये मालिकेतील इतर कलाकारही पाहायला मिळत आहेत.