By  
on  

पाहा Video : या कारणासाठी गश्मीर महाजनीने चक्क साबणाने तोंड धुतानाचा केला व्हिडीओ

सोशल मिडीयावर कोणती गोष्ट ट्रेंड होईल काय व्हायरल होईल काहीच सांगता येत नाही. त्यातच आता मनोरंजन विश्वातील कलाकार हे त्यांच्या फॉलोवर्सचा आकडा वाढला की विविध व्हिडीओ पोस्ट करून चाहत्यांचे आभार मानण्याचा ट्रेंड सोशल मिडीयावर आहे.

अभिनेता गश्मीर महाजनीने इन्स्टाग्राम या सोशल मिडीया अकाउंटवर चक्क एक लाख फॉलोवर्सचा आकडा पार केला आहे. याच आनंदात गश्मीरने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत गश्मीर चक्क साबणाने तोंड धुवून चाहत्यांचे आभार मानताना दिसतोय.

 

'दिल्ली बेली' सिनेमातील 'भाग डिके बोस' या गाण्यावर गश्मीरचा हा व्हिडीओ आहे. यात गश्मीरने चाहत्यांसाठी खास व्हिडीओ करून त्यांचे आभार मानले आहेत. या पोस्टमध्ये गश्मीर लिहीतो की, "म्हंटलं धन्यवाद करण्याआधी तोंड नीट साबणानं धुवावं."

Author

Recommended

PeepingMoon Exclusive