अभिनेत्री सई लोकूरला आज वाढदिवसानिमित्त सोशल मिडीयावरही शुभेच्छा दिल्या जात आहेत. तिच्या चाहत्यांसह मित्रमंडळी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. यातच सईची खास मैत्रीण मेघा धाडेनेही सईला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत.
मेघाने सोशल मिडीयावर सईसोबतचा फोटो पोस्ट करून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मेघा या पोस्टमध्ये लिहीते की, "उत्तम मित्र मिळणे कठीण असते. म्हणूनच आजच्या या खास दिवशी मला वाटतय की तुला सांगावं की तुझी मैत्री किती महत्त्वाची आहे. कधीच विचार करू नकोस की तू एकटी आहेस. मी तुझ्यासाठी नेहमीच आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा. डार्लिंग सई."
या पोस्टमध्ये मेघाने सईसोबतचा बिग बॉस शोमधील फोटो पोस्ट केला आहे. या शोमध्ये मेघा आणि सईची मैत्री चांगलीच चर्चेत राहिली होती. बिग बॉसच्या टास्कमध्येही दोघींची चांगली खेळी पाहायला मिळायची. बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात स्पर्धक म्हणून दिसलेल्या या दोघींची मैत्री बिग बॉसच्या घराबाहेरही घट्ट झालेली पाहायला मिळतय.