'बाळूमामा'मधील सुंदरबाईंनी घेतला अखेरचा श्वास, सुमीतने पोस्ट केले सेटवरी या सीनचे फोटो

By  
on  

 

बाळूमामाच्या नावानं चांगभलं ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. या मालिकेचे चाहते या मालिकेचा एकही भाग चुकवत नाहीत. आता या मालिकेती सुंदरबाईंनी सगळ्यांचा निरोप घेतला आहे. मालिकेत सुंदराबाईंनी अखेरचा श्वास घेतल्याचं पाहायला मिळतय. 

'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' मालिकेत सुंदराबाईंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अंकिताचा या मालिकेतील हा शेवटचा सीन होता. याच निमित्ताने बाळूमामा साकारणारा अभिनेता सुमीत पुसावळेने या सीनचे काही फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत.

या पोस्टमध्ये सुमीत लिहीतो की, "हाच तो क्षण हीच ती वेळ..असा सीन जो कधी संपुच नये अस वाटत होत. तुझी आठवण येईल अंकिता, तुझ्या पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा."

मालिकेती आई-मुलाची भूमिका साकारणाऱ्या या कलाकारांची ऑफस्क्रिन मैत्री आणि चांगली बॉंडिंग असल्याचं दिसतय.मालिकेतील हा सीन भावुक करणारा आहे. सुंदरबाई निरोप घेण्याआधी बाळूमामाचं रुप पाहून शेवटचा श्वास घेत असल्याचं या सीनमध्ये दाखवण्यात आलय. बाळूमामाची आई सुंदराच्या निधनाने शोकाकुल वातावरणाचा हा सीन आहे. या सीन संपुच नये असं बाळूमामा सुमीतला वाटत असल्याचं म्हणत या पोस्टमध्ये तो व्यक्त झाला आहे.

 

Recommended

Loading...
Share