By  
on  

'सिंगींग स्टार'च्या मंचावर होतेय यशोमानच्या गायनाचं कौतुक, मानले चाहत्यांचे आभार

'सिंगीग स्टार' या रिएलिटी सिंगींग शोमध्ये अभिनेता अभिनेता-अभिनेत्री त्यांचं गायनकौशल्य सादर करताना दिसतात. यातच अभिनेता यशोमान आपटेदेखील त्याचं गायनकौशल्य दाखवताना दिसतो. या मंचावर नुकत्याच झालेल्या परफॉर्मन्ससाठी यशोमानचं कौतुक झालं. त्याच्या या परफॉर्मन्सला मिळालेल्या चांगल्या प्रतिक्रियेसाठी त्याने सगळ्यांचे आभार मानले आहेत.

यशोमानने सोशल मिडीयावर एक पोस्ट करून चाहत्यांचे आभार मानले आहेत. तो या पोस्टमध्ये लिहीतो की, "कालच्या गाण्याला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!!! असंच प्रेम करत रहा आणि पहात रहा."

 

या कार्यक्रमात प्रत्येक कलाकारासोबत एक गायक किंवा गायिका मेन्टॉर म्हणून आहेत. या कार्यक्रमात यशोमानसोबत गायिका शरयु दाते त्याची मेन्टॉर आहे.

'फुलपाखरू' या मालिकेतून यशोमन प्रचंड लोकप्रीय झाला. आता या सिंगींग कार्यक्रमात तो त्याचं गायनकौशल्य सादर करताना दिसतोय.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive