By  
on  

गानसम्राज्ञी लतादीदींकडून स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांना वाढदिवासानिमित्ताने खास संदेश

भारतरत्न लता मंगेशकर आणि प्रसिद्ध गायिका आशा भोसले ही दोन्ही नावं जगभरात प्रसिद्ध आहेत. त्याची गायकी आणि त्यांच्या प्रतिभेने त्यांनी असंख्य रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलय. 

जगभरात आपल्या हटके गायनशैलीने कित्येक वर्षे  रसिकांच्या भारावुन सोडणाऱ्या  प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्ताने बहिण गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी खास शुभेच्छा दिल्या आहेत. लता दीदींनी सोशल मिडीयावर एक खास पोस्ट केली आहे. 

लतादीदी या पोस्टमध्ये लिहीतात की, "नमस्कार. आज माझी लहान बहीण आशा भोसलेचा वाढदिवस आहे. आशी ही खूप मोठी गायिका आहे. तिचं नाव जगभरात प्रसिद्ध आहे. मी तिला आशिर्वाद देते की ती अशीत गात राहू दे आणि नेहमीच आनंदी राहू दे." लतादीदींनी आशा भोसले यांच्यासोबतचा खास जुना फोटो पोस्ट करून हा संदेश लिहीला आहे.

 

लतादीदी अनेकदा बहीण आशा भोसले यांचं कौतुक करताना दिसल्या आहेत. शिवाय आशा भोसलेहे लतादीदींविषयी अनेकदा उल्लेख करतात आणि दीदींचा प्रचंड आदर करतात.

लतादीदी अनेक कलाकारांच्या वाढदिवसानिमित्ताने आवर्जुन सोशल मिडीयावर पोस्ट करतात. शिवाय बहीण आशा भोसलेंनाही त्यांनी अशा खास शुभेच्छा दिल्या आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive