By  
on  

आमंत्रण अरुंधती आणि अनिरुद्धच्या लग्नाच्या 25व्या वाढदिवसाचं

'आई कुठे काय करते' या मालिकेचा प्रवास दिवसेंदिवस रंजक होताना पाहायला मिळतोय. अरुंधती आणि अनिरुद्धच्या 25व्या लग्नाच्या वाढदिवसाला खास सोहळा पार पडणार आहे. हा सोहळा म्हणजे अरुंधती आणि अनिरुद्धचा पुन्हा लग्न पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी संपूर्ण कुटुंब प्रचंड उत्सुक आहे. 

मात्र दुसरीकडे याच दिवशी अनिरुद्धची मैत्रीण संजना ही अनिरुद्धसोबत लग्न करण्याचा दावा करते. त्यामुळे या दिवशी काय काय घडेल हे पाहणं प्रेक्षकांसाठी रंजक ठरणार आहे. यातच अरुंधतीने सगळ्यांना लग्नाचं आमंत्रण दिलं आहे. अरुंधतीच्या भूमिकेत असलेली अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने सोशल मिडीयावर अरुंधती आणि अनिरुद्धचा फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये ती लिहीते की, "आमच्या लग्नाच्या 25 व्या वाढदिवसाला येतात नं???"

 

तेव्हा हा सोहळा नक्कीच डोळे दिपवुन टाकणारा असेल. अनिरुद्ध या सोहळ्यात सहभागी होईल का ? की अनिरुद्ध संजनासोबत लग्न करेल ?  या सोहळ्यात आणखी कोणते ट्विस्ट पाहायला मिळतील ? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive