पावसात अशी चिंब भिजली सोनाली कुलकर्णी, येतय नवं गाणं

By  
on  

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नुकताच पावसात मनचिंब भिजण्याचा आनंद लुटला आहे. हे निमित्त आहे तिच्या नव्या गाण्यासाठी. सोनाली कुलकर्णी ही लवकरच एका पावसाच्या गाण्यात झळकणार आहे. नुकताच या गाण्याचा टिझर प्रदर्शित झाला असून या टिझरमध्ये सोनाली पावसात चिंब भिजत मजा करताना दिसत आहे.

 

हा व्हिडीओ पाहून कुणालाही पावसात भिजण्याची इच्छा होईल असा हा व्हिडीओ आहे. "पाऊस हा तुझा नि माझा" असे या गाण्याचे बोल आहेत. लवकरच हे गाणं व्हिडीओ पॅलेसवर प्रदर्शित होणार आहे. हा टिझर पोस्ट करताना सोनाली सोशल मिडीयावर लिहीते की, "ओल्या चिंब सोबतीचा...पाऊस हा तुझा नि माझा." 

सोनालीचं हे नवं गाणं लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Recommended

Loading...
Share