अभिनेता गश्मीर महाजनी हा सोशल मिडीयावर सध्या मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतय. नुकतच गश्मीरने त्याचे ऑनलाईन डान्स वर्कशॉप सुरु केले होते. त्याचे व्हिडीओही त्याने सोशल मिडीयावर पोस्ट केले. याशिवाय गश्मीर त्याच्या चाहत्यांसाठी विविध व्हिडीओ पोस्ट करताना दिसतो.
गश्मीरने नुकताच एक गोंडस व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ त्याच्या मुलासोबतचा आहे. याआधीही गश्मीरने त्याच्या मुलासोबतचे फोटो व्हिडीओ पोस्ट केले आहेत.
या व्हिडीओत गश्मीरचा मुलगा त्याच्यासारखी नक्कल करताना दिसतोय. गश्मीर जसा हात मागे ठेवून चालतो तसा तोही चालतो. आणि म्हणून गश्मीरने मुलासोबतचा हा मजेशीर व्हिडीओ पोस्ट केला आहे.
याशिवाय तो या पोस्टमध्ये लिहीतो की, “जबाबदारीने चाला. कुणीतरी आपल्या पाऊलावर पाऊल टाकत आहे.”
जसे आई-वडिल करतात मुलही तसच त्यांच्या पावलावर पाऊल टाकताना दिसतात. त्याचचं हे ताजं उदाहरण म्हणता येईल.