सासरेबुवांकडून चिराग पाटील घेतोय फिटनेस ट्रेनिंग

By  
on  

अभिनेता चिराग पाटील सध्या त्याच्या फिटनेसकडे जास्त लक्ष देत आहे. चिरागला फिटनेसची आवड आहे. मात्र सध्या चिराग त्याचं ट्रान्सफॉरमेशन करतोय की काय असचं चित्र दिसतय. त्याचं कारण आहे त्याने नुकताच सोशल मिडीयावर पोस्ट केलेला व्हिडीओ. 

 चिरागने नुकतीच वर्कआउटला सुरुवात केली आहे. यासाठी त्याला सलील अंकोला म्हणजेच चिरागचे सासरे मदत करताना दिसत आहेत.
चिरागने सोशल मिडीयावर नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये सलील अंकोला हे चिरागला ट्रेनिंग देताना दिसत आहेत. या व्हिडीओल दंगल सिनेमातील "बापू सेहत के लिए तू तो हानीकारक है.." हे गाणं लावण्यात आलं आहे.

अभिनेता सलील अंकोला हे माजी क्रिकेटपटू असून ते चिरागचे वडील क्रिकेटपटू संदीप पाटील यांचे घनीष्ट मित्र आहेत. शिवाय ते चिरागचे सासरे देखील आहेत. 
सलील अंकोला यांचा जबरदस्त फिटनेस आहे आणि त्यांना याचं चांगलं ज्ञानही आहे. तेव्हा चिरागसाठी त्यांच्यापेक्षा उत्तम ट्रेनर कोण असू शकतो. म्हणूनच चिरागने त्यांच्याकडून ट्रेनिंग घेण्यास सुरुवात केली आहे. तेव्हा या ट्रेनिंगनंतर चिरागचा वेगळा लुक पाहायला मिळेल यात शंका नाही.

Recommended

Loading...
Share