By  
on  

'मिसेस मुख्यमंत्री' मालिका घेत आहे निरोप, समरने शेयर केली ही आठवण

एका हटके कहाणीने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी मालिका 'मिसेस मुख्यमंत्री' आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. लवकरच या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित करून मालिकेला निरोप देण्यात येईल. याच मालिकेच्या चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवसाची आठवण समरने म्हणजेच अभिनेता तेजस बर्वेने शेयर केली आहे.

तेजसने सुमी साकारणाऱ्या अमृतासोबतचा फोटो पोस्ट केला आहे. तो लिहीतो की, "शेवटचं समर आणि सुमी साकारताना, शेवटच्या दिवसाच्या चित्रीकरणाची आठवण."

 

तेव्हा या मालिकेसह समर आणि सुमी देखील प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. मात्र या मालिकेच्या जागी आता 'लाडाची मी लेक गं' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत अभिनेत्री मिताली मयेकर, आरोह वेलणकर आणि अभिनेत्री स्मिता तांबे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive