By  
on  

पाहा Video : सोनाली कुलकर्णीने असा लुटला पावसाचा मनसोक्त आनंद, नवं गाणं प्रदर्शित

पावसात मनसोक्त भिजून निसर्गरम्य वातावरणात नाचायला कुणाला आवडणार नाही. अशीच संधी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला मिळाली आहे. याचं निमित्त आहे तिचं नुकतचं प्रदर्शित झालेलं गाणं. सोनाली कुलकर्णीचं नवं व्हिडीओ साँग नुकतच प्रदर्शित झालं आहे. "पाऊस हा तुझा नी माझा" असे या गाण्याचे बोल आहेत.  

व्हिडीओ पॅलेसच्या या नव्या गाण्यात सोनाली पावसात मनसोक्त भिजताना दिसत आहे. पावसाळी निसर्गरम्य वातावरणात सोनाली मनमुराद आनंद लुटतेय आणि नाचताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कुणालाही पावसात भिजल्याचा भास होईल असं हे गाणं आहे.

 

या गाण्याला सागर पाटील यांचं संगीत असून गौरी सरनाईक याचे गीत आणि प्राजक्ता शेनाईचा आवाज या गाण्याला लाभला आहे. या गाण्यात काही कवितेच्या जागा सोनालीच्या आवाजात ऐकायला मिळतात.

Recommended

PeepingMoon Exclusive