'मिसेस मुख्यमंत्री' ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. एका वेगळ्या संकल्पनेसह सुरु झालेला या मालिकेचा प्रवास आता संपतोय. समर आणि सुमीची जोडी या मालिकेतून चांगलीच लोकप्रिय झाली. याशिवाय या मालिकेतील इतर पात्रही लक्षवेधी ठरेल.
लवकरच या मालिकेचा शेवटचा एपिसोड प्रदर्शित होऊन ही मालिका निरोप घेईल. मात्र या मालिकेतील कलाकारांसाठी हा भावनिक क्षण आहे. मिसेस मुख्यमंत्री बनलेली सुमी म्हणजेच अभिनेत्री अमृता धोंगडे ही मालिका निरोप घेत असल्यानं भावुक झाली आहे.
समरच्या भूमिकेत असणारा अभिनेता तेजस बर्वेने अमृताचा हा भावुक क्षण पोस्ट केला आहे. या फोटोत बबनदेखील पाहायला मिळतोय. तेजस या पोस्टमध्ये लिहीतो की, "आणि एक रडणारा चेहरा. हा बंध. शेवटचा फोटो."
समर, सुमी आणि बबनच्या भूमिकेतील हा शेवटचा फोटो असल्याचं म्हणत तेजसने ही भावुक पोस्ट केली आहे.