अभिनेता स्वप्निल जोशी त्याच्या सोशल मिडीया अकाउंटवरून मुलगी मायरा आणि मुलगा राघव विषयीच्या विविध गोष्टी शेयर करत असतो. मात्र नुकतच मुलगी मायराविषयीची खास गोष्ट स्वप्निलने शेयर केली आहे. स्वप्निलची मुलगी मायरा ही भारतीय स्तरातील 2020च्या फोनिक्स ऑलम्पियाडमध्ये पहिली आली आहे. या परिक्षेत मायराने पहिला क्रमांक पटकावला असून तिला याचं मेडल आणि सर्टिफिकेट देण्यात आलय.
हाच आनंद स्वप्निलने सोशल मिडीयाच्या माध्यमातून शेयर केला आहे. यासोबतच त्याने मुलिचा फोटोही या पोस्टमध्ये जोडला आहे. स्वप्निलच्या या पोस्टवर अनेकांनी मायराचे अभिनंदन केले आहे. अभिनेता सुबोध भावे, श्रुती मराठी या कलाकारांसह अनेक चाहत्यांनी स्वप्निल आणि मायराला शुभेच्छा दिल्या आहेत.
...And the lil one excels! Comes First at the India level PHONICS OLYMPIAD २०२० ! #maayra so proud ! pic.twitter.com/w1H7eq7Bkl
— Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी (@swwapniljoshi) September 21, 2020
पिल्लू टिव्ही या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातूनही स्वप्निल त्याच्या मुलांच्या विविध आठवणी, किस्से शेयर करत असतो.