पाहा Video : प्रियाला आहे या गोष्टीची आवड, म्हणते "...हे आहे दुसरं प्रेम"

By  
on  

अभिनेत्री प्रिया बापट सोशल मिडीयावर बऱ्यापैकी सक्रिय असते. अधूनमधून प्रिया तिचे व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करताना दिसते. प्रिया बापटने नुकताच एक व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर केला आहे. या व्हिडीओसह ती तिच्या दुसऱ्या प्रेमाविषयी सांगते.

अभिनेत्री प्रिया  बापटचं हे दुसर प्रेम म्हणजे प्रवास. प्रियाला प्रवास करायला, भटकंती करायला प्रचंड आवडतं. नुकत्याच पोस्ट केलेल्या रील व्हिडीओत प्रियाने तिच्या प्रवासातील काही खास क्षण पोस्ट केले आहेत. हा व्हिडीओ पोस्ट करून प्रिया प्रवास हे तिचं दुसरं प्रेम असल्याचं सांगते.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

An other reel dedicated to my second love #Travel And my fav track! #khoj

A post shared by Priya Bapat (@priyabapat) on

 

या पोस्टमध्ये प्रिया लिहीते की, "हे रील माझं दुसरं प्रेम प्रवासाला समर्पित, आणि माझं आवडतं ट्रॅक." या व्हिडीओला प्रियाने तिचं आवडतं गाणंही जोडलय. प्रियाच्या सोशल मिडीया अकाउंटवर अनेकता तिच्या प्रवासातील क्षण पाहायला मिळतात. विशेषकरून प्रिया आणि पति उमेश या कपलला एकत्र भटकंती करायला आवडते. त्यांचे तसे फोटोही सोशल मिडीयावर याआधी पाहायला मिळाले आहेत.

Recommended

Loading...
Share