By  
on  

रवी जाधव यांच्या खास स्कूटरवर बसलेला फोटो पोस्ट करून या अभिनेत्रीने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक कलाकारांनीही त्यांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री अमृता खानविलकरनेही रवी यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. रवी जाधव यांच्यासोबतचा त्यांच्या खास जुन्या स्कूटरवर काढलेला फोटो अमृताने पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये अमृता लिहीते की, "प्रिय रवी जाधव वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्ही फाईन वाईनसारखे आहात आणि अजून उत्तम येणे बाकी आहे. तुमचा उत्साह आणि जगण्याचा अद्भुत दृष्टीकोन, तुमच्याविषयीच्या या गोष्टी मला प्रिय वाटतात. आम्हाला नेहमीच आश्चर्यचकित करत राहा. खुप प्रेम."

 

या पोस्टमधून अमृताने रवी जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासह रवी जाधव यांच्या अनेक चाहत्यांनी आणि मराठीसह हिंदी कलाविश्वातील कलाकारांनी त्यांना वाढदिवसानिमित्तानं शुभेच्छा दिल्या आहेत.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive