सजणार शंतनू आणि शर्वरीचा ऑनलाईन विवाह सोहळा

By  
on  

लवकरच प्रेक्षकांसाठी एक नवी गोष्ट भेटीला येत आहे. 'शुभमंगल ऑनलाईन' असं या नव्या मालिकेचं नाव आहे. या मालिकेत अभिनेता सुयश टिळक आणि सायली संजीव ही जोडी पाहायला मिळेल. मुख्य म्हणजे मालिकेतील या जोडीचा अनोखा विवाह सोहळा पार पडणार आहे. 

शंतनू आणि शर्वरीची ऑनलाईन भेट नंतर लग्नाच्या महत्त्वपूर्ण टप्प्यावर येऊन थांबेत. त्याचा हा ऑनलाईन प्रवास पाहणं रंजक ठरेल यात शंका नाही. मात्र आता उत्सुकता आहे त्यांच्या ऑनलाईन लग्नसोहळ्याची. हा ऑनलाईन लग्नसोहळा कसा असेल याचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच अशाप्रकारचा लग्नसोहळा रसिक प्रेक्षकांना बघायला मिळणार असल्याचं बोललं जातय.

याविषयी अभिनेता सुयश टिळक सांगतो की, "‘खूपच उत्सुक आहे मी कारण लॉकडाऊन नंतरची माझी ही पहिलीच मालिका आहे... गेले काही महिने मी टेलिव्हिजनवर काम करत नव्हतो. पण जेंव्हा या मालिकेबद्दल विचारणा झाली तेंव्हा मी लगेच होकार दिला... ऑडीशन्स, वर्कशॉप्स सगळं ऑनलाईन सुरू होतं त्यामुळे लॉकडाऊननंतर काहीतरी वेगळं करणार आहोत ही भावना मनामध्ये होती.  शुभमंगल ऑनलाईन  मालिकेद्वारे आम्हाला सध्याची गोष्ट सांगायला मिळते आहे ही एक जमेची बाजू आहे, त्याची एक वेगळी मजा आहे आणि प्रेक्षकांना हे बघायला नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे."

 

तर या मालिकेविषयी सायली संजीव सांगते की, " सायली जशी आहे तशी खूप लोकांना माहिती नाहीये... कुठेतरी शर्वरी आणि सायलीमध्ये खूप साम्य आहे. शर्वरी या पात्राच्या सगळेच प्रेमात पडतील याची मला खात्री आहे कारण मुळातच ते तितकं गोड आहे. खरं सांगायचं तर या मालिकेमुळे माझ्या आयुष्यात खूप सकारात्मकता आली. ही मालिका करण्याची संधी मला मिळाली म्हणून मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते.”

 या मालिकेतून सुयश टिळक आणि सायली संजीव ही जोडी पहिल्यांदाच ऑनस्क्रिन एकत्र दिसणार आहे. येत्या 28 सप्टेंबर पासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Recommended

Loading...
Share