सहा महिन्यांनी अभिनेता चिराग पाटीलने केली कामाला सुरुवात, केलं आगामी सिनेमाचं डबिंग

By  
on  

कोरोनाग्रस्त परिस्थितीत लॉकडाउनमुळे मनोरंजन विश्वाचं काम ठप्प झालं होतं. मात्र हळूहळू अनलॉक होत असताना मनोरंजन क्षेत्रातील कामाला सुरुवात झाली आहे. अनेक कलाकारांनी त्यांच्या सिनेमांचं राहिलेलं चित्रीकरण करण्यास सुरुवात केली तर काहींनी डबिंग पूर्ण केलं. अभिनेता चिराग पाटीलनेही आता कामाला सुरुवात केली आहे. चिरागने तब्बल सहा महिन्यांनी कामाला सुरुवात केली आहे.

 

चिराग पाटीलने त्याच्या आगामी मराठीसाठी डबिंगला सुरुवात केली आहे. नुकतच सोशल मिडीयाच्या माध्यमातून चिरागने त्याच्या कामाला सुरुवात केली असल्याचं सांगीतलं आहे. चिराग त्याच्या पोस्टमध्ये लिहीतो की, "6 महिन्यांनंतर कामावर परतलोय." 

 

यासोबत चिरागने त्याचे डबिंगचे फोटो पोस्ट केले आहेत. तेव्हा या सिनेमाविषयीची घोषणा चिराग लवकरच करेल यात शंका नाही.

चिराग हा प्रसिद्ध क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा मुलगा आहे. '83' या हिंदी सिनेमात चिराग वडिल संदीप पाटील यांच्याच भूमिकेत दिसणार आहे. 

Recommended

Loading...
Share