पाहा Photos : पुष्कर जोगने 'वेल डन बेबी'च्या या आठवणींना दिला उजाळा

By  
on  

कोरोनाग्रस्त परिस्थितीत लॉकडाउनमुळे अनेक सिनेमे रखडले. सिनेमागृहे बंद झाल्यामुळे काही सिनेमे ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आले. तर काही सिनेमांच्या रखडलेल्या चित्रीकरणाला अनलॉकमुळे सुरुवात केली गेली. 'वेल डनी बेबी' या मराठी सिनेमाचं कामही नुकतच पूर्ण झालं आहे. नुकतच या सिनेमाचं डबिंगही पूर्ण करण्यात आलं आहे. अभिनेता पुष्कर जोग, अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेत्री वंदना गुप्ते या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. मात्र हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला कधी येतोय याचीच उत्सुकता आता आहे.

मात्र सोशल मिडीयाच्या माध्यमातून अभिनेता पुष्कर जोग या सिनेमाच्या विविध आठवणींना उजाळा देत असतो. लॉकडाउनमध्येही पुष्करने या सिनेमाच्या सेटवरील अनेक आठवणी सोशल मिडीयावर शेयर केल्या. आणि पुन्हा पुष्करने नुकतेच या सिनेमाच्या सेटवरील काही फोटो शेयर केले आहेत. या फोटोंमध्ये पुष्कर गाडी चालवतोय आणि अमृता त्याच्या बाजूला बसलेली असल्याचं पाहायला मिळतय.

 

पुष्करच्या या थ्रोबॅक पोस्ट सिनेमाविषयीची उत्सुकता आणखी वाढवत असल्याचं चित्र पाहायला मिळतय.

Recommended

Loading...
Share