By  
on  

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट उलगडणार आता छोट्या पडद्यावर

भारतीय संविधानाचे शिल्पकार सर्वाचे प्रेरणास्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची गौरव गाथा आपण आत्तापर्यंत फक्त सिनेमा आणि माहितीपटातून पाहिली आहे. पण आता लवकरच बाबसाहेबांचा जीवनपट छोट्या पडद्यावर मालिका स्वरुपातत उलगडणार आहे.

सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील उपेक्षितांच्या जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. महामानवाचे हे महान कार्य मालिकेतून उलगडण्याचं शिवधनुष्य स्टार प्रवाह वाहिनी करणार आहे.

https://twitter.com/StarPravah/status/1096639049865908224

'भीमराव: एक गौरवगाथा' या मालिकेत बाबासाहेबांची भूमिका नेमकी कोण साकारणार, या मालिकेचं दिग्दर्शन कोण करणार आणि इतर कोणते कलाकार यात झळकणार  या गोष्टींचा अद्याप उलगडा झालेला नाही. पण प्रेक्षकांना मात्र बाबासाहेबांच्या जीवनावरील या मालिकेची प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.

भीमराव : एक गौरवगाथा ही मालिका  येत्या 14 एप्रिलपासून रसिकांच्या भेटीला येत आहे.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive