By  
on  

परिवारासोबत सुनील बर्वे यांनी असा लुटला निसर्गाचा आनंद

सध्या कोरोनाग्रस्त काळात लॉकडाउनपासून अनलॉकपर्यंत अनेक मंडळी घरात बसून कंटाळले आहेत. म्हणूनच काहींनी सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून निसर्गरम्य ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला. अभिनेता सुनील बर्वे आणि त्यांचा परिवार बऱ्याच दिवसांपासून कंटाळले होते. मग त्यांनी गरुडमाचीला जाण्याचा निर्णय घेतला. या निसर्गरम्य वातावरणात त्यांनीही निवांत वेळ घालवला.

या खास ट्रीपविषयी सुनील बर्वे यांनी पोस्ट केली आहे. या ट्रीपचा अनुभव त्यांनी शेयर केला आहे. सोबतच कुटुंबासोबतचे काही खास क्षणही शेयर केले आहेत.

सुनील बर्वे लिहीतात की, "गेल्या आठवड्यात कंटाळ्यामुळे कंटाळून, आम्ही दोन दिवस बाहेर जाण्याचं ठरवलं. बऱ्याच थंड हवेच्या ठिकाणांचा विचार झाला, पण एका जागेचं नाव निघताच चौघेही त्याच नावावर तुटून पडलो, एकमताने तिथेच जायचं ठरवलं, आणि ते नाव होतं, ‘गरूडमाची’ लागलिच सर्वश्री वसंत वसंत लिमये ना फोन लावला, व कल्पना सांगितली व तत्क्षणी होकारार्थी उत्तर मिळालं. थोड्या वेळातंच बुकिंग कन्फर्म झाल्याचा फोन आला. येण्या पुर्वीच्या फाॅर्मॅलिटीज बद्दल सांगण्यात आलं. नुसतं आपण दोन दिवस कुठेतरी निसर्गरम्य ठिकाणी जाणार आहोत ह्या कल्पनेनच घरातलं वातावरण बदलून गेलं.सर्व चाचण्या करून आम्ही ‘गरूडमाची’ वर स्वार होण्यासाठी निघालो. मी आणि अपर्णाने आधी पाहीलेलं असल्यामुळे, पहिल्यांदाच तिथे येणाऱ्या, सानिका, अथर्व ला भरभरून सांगत होतो, आणि ती दोघं नुसत्या कल्पनेनंही आनंदून गेली होती."

 या मोठ्या पोस्टमध्ये तिथे गेल्यानंतरचा सुखद अनुभवही सुनील यांनी या पोस्टमध्ये शेयर केला आहे. सध्याच्या परिस्थितीत घरात बसून बसून अनेक जण कंटाळले आहेत. त्यामुळे निसर्गरम्य ठिकाणी सर्व नियमांचे पालन करून अनेकांनी निसर्गरम्य वातावरणात वेळ घालवण्याचा पर्याय निवडलेला दिसतोय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

गेल्या आठवड्यात कंटाळ्यामुळे कंटाळून, आम्ही दोन दिवस बाहेर जाण्याचं ठरवलं. बऱ्याच थंड हवेच्या ठिकाणांचा विचार झाला, पण एका जागेचं नाव निघताच चौघेही त्याच नावावर तुटून पडलो, एकमताने तिथेच जायचं ठरवलं, आणि ते नाव होतं, ‘गरूडमाची’ लागलिच सर्वश्री वसंत वसंत लिमये ना फोन लावला, व कल्पना सांगितली व तत्क्षणी होकारार्थी उत्तर मिळालं. थोड्या वेळातंच बुकिंग कन्फर्म झाल्याचा फोन आला. येण्या पुर्वीच्या फाॅर्मॅलिटीज बद्दल सांगण्यात आलं. नुसतं आपण दोन दिवस कुठेतरी निसर्गरम्य ठिकाणी जाणार आहोत ह्या कल्पनेनच घरातलं वातावरण बदलून गेलं. सर्व चाचण्या करून आम्ही ‘गरूडमाची’ वर स्वार होण्यासाठी निघालो. मी आणि अपर्णाने आधी पाहीलेलं असल्यामुळे, पहिल्यांदाच तिथे येणाऱ्या, सानिका, अथर्व ला भरभरून सांगत होतो, आणि ती दोघं नुसत्या कल्पनेनंही आनंदून गेली होती. जसं जसं गरूडमाची येऊ लागलं, आणि निसर्गाचं सौंदर्य खुलू लागलं, आम्हा सगळ्यांचाच उत्साह दुणावू लागला, मोबाईल सुद्धा रेंजपासून पळू लागला, आणि ह्या अनुभवात गढून गेले असतानाच, गरूडमाचीचं गेट चुकवून काही फरलांग गाडी पुढं गेली. घाटातील त्या रस्त्यावर तुरळक रहदारी असल्यामुळे गाडी अगदी सहज वळवून गेट मधे थांबलो. पूर्व कल्पना असल्यामुळे, त्वरित गार्ड ने काही सोपस्कार आटपून गेट मधून आम्हाला प्रवेश दिला, व निसर्गाच्या कुशित वसलेलं गरूडमाची पाहून मुलं हरखून गेली. आमच्या प्रतिक्षेत असलेली मृणाल, प्रेम, यांनी आमचं स्वागत केलं, छान चहा नाश्ता झाला, नेमून दिलेल्या प्रशस्त खोल्यांमधे सामान टाकलं, व लगेच मोबाईल मधे फोटो काढण्यास सरसावलो. एक छोटा ट्रेल केला, आजुबाजूचा सर्व परिसर पाहिला, झाडा, फुलां, पक्ष्यांची माहिती संतोष, अमित आणि विनू ह्यांनी दिली. दुसऱ्या दिवशी सुद्धा परत एक ट्रेल करून आम्ही एका धबधब्यात डुंबलो, outdoor management centre मधील वाॅल वर रॅप्लिंग केलं, संतोषने आमची चांगलीच बडदास्त ठेवली. असं सगळं करून संध्याकाळी मुबई कडील प्रवासास मनावर दगड ठेवून निघालो. हा सर्व अनुभव लिहीण्या मागचं कारण एव्हढंच आहे, की नुसत्या त्या अनुभवा बद्दल विचार केल्याने सुद्धा मनात चैतन्य जागृत होतं, आणि पुन्हा हा अनुभव घेई पर्यंत इथे काम जोमाने होतं. गरूडमाचीच्या मालक मंडळीं पासून ते व्यवस्थापनातील मंडळी व कर्मचाऱ्यां पर्यंत सर्वांचा अगत्यशील पाहुणचार म्हणजे नुसते लाड, हा अनुभव कायम स्मरणात राहील. आमच्या बाळ्याच्याच शब्दात सांगायचं तर, ‘और क्या भगवानसे मिलोगे!!!’ खूप धन्यवाद ‘गरूडमाची’ !!!! @barveaparna @barve.sanika @theatharvabarve #highplaces #garudmachi

A post shared by Sunil Barve (@sunilbarve) on

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive