By  
on  

अभिनेत्री सुरभी हांडेचा झाला साखरपुडा

जय मल्हार मालिकेत म्हाळसाची अप्रतिम अशी प्रमुख व्यक्तिरेखा साकारणारी गुणी अभिनेत्री सुरभी हांडे हिचा नुकताच जळगांव येथे साखरपुडा संपन्न झाला. दुर्गेश कुलकर्णी याच्यासोबत जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवार यांच्या उपस्थित सुरभी हांडे हिचा साखरपुडा सोहळा पार पडला.

सध्या सुरभीची कलर्समराठीवर लक्ष्मी सदैव मंगलम ही मालिका प्रचंड गाजतेय. तसंच केदार शिंदे दिग्दर्शित अगंबाई अरेच्चा 2 या सिनेमातसुध्दा ती मह्त्त्वपूर्ण व्यक्तिरेखेत झळकली होती.

गडद आकाशी रंगाच्या या साडीत साखरपुड्याच्या पूजा विधीत सुरभी खुप खुलून दिसत होती.

या प्रसंगी सुरभीच्या चेह-यावरचा आनंद अजिबात लपत नव्हता.

सुरभीचे भावी पती दुर्गेश कुलकर्णी भलतेच खुश दिसत होते.

पारंपारिक आणि कौटुंबिक अशा या साखरपुड्या सोहळ्यात या नवपरिणीत दांपत्याचा प्रपोज करण्याचा फिल्मी स्टाईल अंदाज दिसून आला.

सुरभा आणि तिचे भावी पती दुर्गेश कुलकर्णी या दोघांचेही जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत साखरपुडा सोहळा पार पडला.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive