
मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांचा गौरव करण्यासाठी दरवर्षी अतिशय मानाचे समजणारे फिल्मफेअर मराठी अवॉर्ड्सचं वितरण केलं जातं. या पुरस्कार सोहळ्यामध्ये कच्चा लिंबू या प्रसाद ओक दिग्दर्शित सिनेमाने सर्वाधिक पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवत बाजी मारली आहे. सर्वोत्कृष्ट सिनेमा, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार कच्चा लिंबूने पटकावला तर याच सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सोनाली कुलकर्णीला फिल्मफेअर मराठीची मानाची ब्लॅक लेडी मिळाली. तसंच रिंगण, मुरांबा, फास्टर फेणे या सिनेमांनीसुध्दा विविध पुरस्कार पटकावले अमेय वाघला मुरांबा सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
ज्येष्ठ संगीतकार पंडित हदयनाथ मंगेशकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्रीचा पुरस्कार मिथिला पालकरला मुरांबा सिनेमासाठी मिळाला.
अभिनय बेर्डेला ती सध्या काय करते या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
या इंडो-वेस्टर्न ब्लॅक आऊट-फिटमध्ये अमृताच्या सौंदर्याला चार चॉंद लागतायत
सुंदर अशा या गाऊनमध्ये सोनाली कुलकर्णी खुपच सुंदर दिसतेय.
आपला रॉकिंग परफॉर्मन्स देण्यासाठी मराठी सुपरस्टार स्वप्निल जोशी सज्ज.
ग्लॅमरस अवतारात दिसल्या अभिनेत्री मृण्मयी जोशी आणि प्रिया बापट
नेहमीप्रमाणेच अभिनेत्री सई ताम्हणकरने आपल्या बोल्ड अंदाजात सर्वांना भुरळ पाडली.
अभिनेता पुष्कर जोग फुल ऑन फ्रेश आणि मस्ती मूडमध्ये दिसला.
ग्लिटरी लूकमध्ये अभिनेत्री स्मिता गोंदकर सर्वांचंच लक्ष वेधून घेताना दिसली.
कुठल्याही पुरस्कार सोहळ्यात मानसी नाईकचा परफॉर्मन्स चार चॉंद लावतो. रेड कार्पेटवर दिसली ही दिलखेचक अदा.