By  
on  

Exclusive : ट्रोलिंग आणि नकारात्मकता बाजुला ठेवून सकारात्मक कामासाठी एकत्र येऊयात – सोनाली कुलकर्णी 

राज्यासह देशावर पुन्हा कोरोनाचं भयानक संकट ओढावलं आहे. या संकटात लॉकडाऊनच्या काळात घरात बसूनही एकमेकांना मदत करण्यासाठी अनेक जण पुढाकार घेत असल्याचं दिसत आहेत. यात सोशल मिडीयाचा वापर करुन कोरोनाविषयी जागरुकता आणि योग्य ती माहितीही पसरवली जात आहे. 
सध्याच्या कोरोनाग्रस्त परिस्थितीत सोशल मिडीयाचा योग्य वापर केला जात असल्याचं चित्र पाहायला मिळतय. यातच मराठी कलाकार हे #MahaCovid हा हॅशटॅग वापरून ट्विटरवर माहिती गोळा करून त्याचा पाठपुरावा करुन गरजुंपर्यंत ती माहिती आणि मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही ही या मोहिमेत सहभागी झाली आहे. सीएम रिलीफ फंडमध्ये देणगी देऊनही सोनालीना मदतीचा हात दिलाय.  याविषयी पिपींगमून मराठीने सोनालीशी संवाद साधला. सोनाली सांगते की, “मी सीएम रिलीफ फंडमध्ये डोनेट तर केलय, पण इतरांनीही तसं करावं हे सगळ्यांनी आपआपल्या परीने ठरवावं. मला जेवढं शक्य आहे ते मी करतेय. मी ट्विटरवर इतके दिवस काही पोस्ट करत नव्हते. तिथे सतत नकारात्मकता पाहायला मिळत होती. पोस्ट वाचण्याच्या आधीच अनेक जण नकारात्मक कमेंट करतात. मात्र आता महा कोव्हिडच्या निमित्ताने मराठी लोक, मराठी कलाकार हे जागरुकता निर्माण करत आहेत. मराठी माध्यमातून सोशल मिडीयाच्या सहाय्याने नकारात्मकतेत अशी सकारात्मकता आणण्याचा हा प्रयत्न आहे. यासोबतच प्रत्येक पोस्टचा पाठपुरावाही केला जातोय.”

मात्र या पोस्टमुळे अनेक मदतीचे हात समोर येत आहेत आणि अनेक जण पुढाकार घेत असल्याचही सोनाली सांगते, “मी सीएम रिलीफ फंडचा स्क्रिनशॉट शेयर केला आणि इतरांनाही आवाहन केलं. मला याचा आनंद आहे की त्यानंतर अनेकांनी मला स्क्रिनशॉट पाठवले त्यांनीही मदत केली. एकीकडे ट्रोलिंग आणि नकारात्मकता असली तरी काही लोकं अशा पॉजिटीव्ही गोष्टीही करतात. मला वाटतं ट्रोलिंग आणि नकारात्मकता बाजूला ठेवून अशा कामासाठी एकत्र येऊयात, सोशल मिडीयाचा सकारात्मक वापर करुयात. सध्याच्या परिस्थितीत अशा मदतीसाठी घरात राहून एकत्र येणं गरजेचं आहे.”

सध्याच्या कोरोना काळात अनेक जणांना अपूर्ण आणि अचूक माहिती असल्याचही सोनालीच्या निदर्शनास आलय. यासाठी लोकांना जागरु करणं महत्त्वाचं असल्याचं ती सांगते. “मी नुकतीच प्लाझ्मा डोनेशनची पोस्ट केली होती तर उलट मलाच सवाल केला गेला की तुम्ही प्लाझ्मा डोनेट केलय का ? तर प्लाझ्मा दान फक्त कोरोना झालेल्या व्यक्ति करु शकतात याचही ज्ञान आणि माहिती अनेकांना नाहीय. मग अशा परिस्थितीत अपूर्ण आणि अचूक माहितीमुळे अनेकांचं नुकसान होत आहे. त्यामुळे लोकांना जागरुक करणं महत्त्वाचं आहे, जे आम्ही सोशल मिडीयाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतोय.”
शक्य होईल आणि घरात बसून जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न सोनाली करत असल्याचं सागंते.  


सोशल मिडीया या माध्यमाचा हे कलाकार योग्य तो वापर करत असल्याचं चित्र आता पाहायला मिळतय. त्यामुळे जागरुकता निर्माण होऊन आणि माहितीचा योग्या पाठपुरावा करुन ती माहिती आणि गरजुंना मदतही होत असल्याचं दिसतय.

Recommended

PeepingMoon Exclusive