PeepingMoon Exclusive : जगप्रसिद्ध tabloid च्या कव्हर पेजवर झळकणारी सोनाली कुलकर्णी ठरली पहिली मराठी अभिनेत्री , म्हणते "मी भारावून गेले"

By  
on  

मराठी चित्रपट आणि मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांनी जागतिक पातळीवरही नावलौकीक केलं आहे. भारतातच नाही तर जगभरातही त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. विविध चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून मराठी चित्रपट जगभरात पोहोचला आहे. मग अशात जेव्हा जागतिक पातळीवरील मोठ्या व्यासपीठावर, वृत्तपत्र, मासिकांवर जेव्हा मराठी कलाकार झळकतात तेव्हा ही अभिमानाची आणि कौतुकास्पद गोष्ट ठरते. 
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीवर सध्या असाच कौतुकाचा वर्षाव होत आहे. अप्सरा आली फेम म्हणून ओळख मिळालेल्या सोनालीने मराठी मनोरंजन विश्वात स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलय. यातच आता तिच्या कामाची दखल जागतिक पातळीवरही घेण्यात आली आहे. 


 7 मे, 2021 रोजी सोनालीने कुणाल बेनोडकर सोबत लगीनगाठ बांधली. सोनालीने तिच्या वाढदिवसाला लग्न झाल्याच्या गुड न्यूजची घोषणा केली. सोनाली आणि कुणालचा हा लग्नसोहळा अतिशय साध्या पद्धतिने दुबईत पार पडला. याचीच बातमी झळकली ती चक्क जगप्रसिद्ध गल्फ न्यूजच्या टॅबलॉईडवर. गल्फ न्यूजने नुकतीच सोनालीची खास मुलाखत घेतली आहे. या टॅबलॉईडच्या कव्हर पेजवर सोनाली कुलकर्णी झळकली आहे. या जगप्रसिद्ध टॅबलॉईडवर झळकणारी सोनाली कुलकर्णी ही पहिली मराठी अभिनेत्री ठरली आहे. 
याविषयी पिपींगमून मराठीने सोनालीसोबत एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आहे. यावेळी सोनाली सांगते की, "मी भारावून गेले आहे. हे आश्चर्यकारक आहे. आपण मोठे सेलिब्रिटी, ग्लोबल स्टार्स यांना अशा जगप्रसिद्ध वृत्तपत्रांमध्ये पाहिलय. म्हणजे प्रिन्सेस डायना पासून ते एंजेलीना जोलीसारखे कलाकार यावर झळकले आहेत. पण स्वत:ला त्यावर अशा पद्धतिने पाहणं खरच भारावून टाकणारं आहे. मला आनंद होतोय की मराठी सिनेमा आणि मराठी कलाकारांना अशा मोठ्या प्लॅटफॉर्मवर जागतिक पातळीवर ओळख मिळतेय."


 

सोनालीने अतिशय साध्या पद्धतिने दुबईत कुणालसोबत लग्न केलं. यावेळी ती तिच्या आई-वडिल, नातेवाईकांसोबत व्हिडीओ कॉलने जोडली होती. कमी लोकांच्या उपस्थितीत हे लग्न पार पडलं. गल्फ न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सोनालीने साध्या पद्धतिने केलेल्या या लग्नाविषयी सांगीतलय. ती म्हणते की, "मला लोकांना हे सांगायचे होते की लग्न अशा पद्धतिनेही होऊ शकतात. छोट्या शहरांमध्ये लोकं त्यांच्या जीवनभराची जमापुंजी आणि कमाई ही लग्न मोठ्या थाटात करण्यासाठी घालवतात. हा वेडेपणा आहे. सध्याच्या काळात ग्रँड लग्नसोहळे करणं ही कुणाचीही एकमेव प्राथमिकता असू नये."

याशिवाय सोनालीने तिचं करियर, लग्न आणि बऱ्याच गोष्टी या मुलाखतीत सांगीतल्या आहेत. 

Image Courtesy - Gulf News 

Recommended

Loading...
Share