PeepingMoon Exclusive :  बिग बॉसच्या घराबाहेर आल्यावर स्नेहा वाघने हे केलं स्पष्ट, म्हटली “मी जेव्हा बाहेर पडले तेव्हा मला बऱ्याचशा गोष्टी कळाल्या”

By  
on  

बिग बॉस मराठी सिझन 3 चा खेळ आणखी रंगात आलेला पाहायला मिळतोय. फिनालेला काहीच दिवस बाकी असताना आता स्पर्धकांना कंबर कसली आहे. काही दिवसांपूर्वी बिग बॉस मराठीच्या घरात काही खास पाहुण्यांनी हजेरी लावली होती. हे पाहुणे म्हणजे स्नेहा वाघ, आदिश वैद्य आणि तृप्ती देसाई. हे यंदाच्या सिझनचे स्पर्धक पुन्हा एकदा घरात गेले होते. यात स्नेहा वाघची पुन्हा झालेली एन्ट्री लक्षवेधी ठरली आणि चर्चेत आली. घराबाहेर गेल्यानंतर स्नेहाला बऱ्याच गोष्टी कळाल्या होत्या आणि त्याचविषयी ती घरात पुन्हा आल्यावर बोलली. पिपींगमून मराठीने नुकतीच स्नेहा वाघची एक्सक्लुझिव्ह मुलाखत केलीय. यावेळी स्नेहाने बऱ्याच गोष्टींविषयी सांगितलं.


स्नेहाने घरात पुन्हा एन्ट्री केल्यानंतर जे स्पर्धक तिच्या मागून बोलले त्यांना उत्तर दिलं होतं. विशेषकरुन जयने तिचा विश्वासघात केला असल्याचही म्हटलं होतं. जय आणि स्नेहाची बिग बॉस मराठीच्या घरात चांगली मैत्री होती. मात्र घराबाहेर पडल्यावर जय देखील स्नेहाच्या मागून बोलला असल्याचं तिच्या निदर्शनास आलं त्यामुळे स्नेहाने जयला देखील खडेबोल सुनावले होते. यावर स्नेहा म्हणते की, “माझ्या मागून काय गोष्टी सुरु होत्या ते मला अजीबात कळाल्या नाहीत. सगळ्यांनी त्या गोष्टी मागून केल्या. पण बिग बॉसचं घरच असं आहे की जिथे मागून बऱ्याच गोष्टी होतात. पण मी तशी नाहीय. मी जेव्हा बाहेर पडले तेव्हा मला बऱ्याचशा अशा गोष्टी कळाल्या ज्या मला जास्त विचित्र वाटल्या. मला त्रासही झाला. मी ज्या ज्या लोकांना आपलं मानलं होतं त्या त्या लोकांच्या तोंडून या गोष्टी ऐकायला मिळाल्या. मी खूप भावुक व्यक्ति आहे. त्यामुळे त्याचा त्रास झाला.”

इतर स्पर्धकही स्नेहासोबत जास्तीचं गोड बोलत असल्याचं तिने यावेळी सांगितलं. ती म्हणते की,“माझ्यासमोर सगळे खूप जास्त गोड वागायचे. सगळे स्पर्धक माझ्याशी चांगलं वागायचे काही स्पर्धक सोडले तर कुणीही माझ्याविरोधात गेले नाही. बऱ्याचशा गोष्टी मी बाहेर आल्यानंतर माझे फॅन्स मला पाठवत होते. अक्षरक्ष एपिसोड्स मला पाठवले की माझा कसा वापर केला गेला हे मला कळूनच दिलं नाही. मग माझ्या लक्षात आलं की हे मला कळूनच दिलं नाही. मग मला जेव्हा परत आत जाण्याची संधी मिळाली तेव्हा मी हे केलं. माझ्या डोक्यात मी ठरवलं होतं की मला काय बोलायचय. कारण ही संधी मला वाया घालवायची नव्हती. तुम्ही माझ्या मागून जे काय केलं पण मी तशी नाही मी जे आहे ते समोर करीन आणि तोंडावर बोलीन आणि मी ते केलं. माझ्या डोक्यात आणि मनात राग होता, मला वाईट वाटलं होतं. मी ते त्यांच्या तोंडावर जाऊन बोलले आणि क्लियर केलं सगळं. तुम्ही मागून केलं होतं मी पुढे जाऊन बोलून ते क्लियर केलं.”


स्नेहाने जयला सुनावल्यानंतर जय भावुक होऊन रडताना दिसला होता. शिवाय दोघांमध्ये त्यानंतर जास्त संवाद दिसला नाही. यावर स्नेहा म्हणते की, “जयसोबत माझी चांगली मैत्री होती. पण मला हर्ट झालं. मी त्याच्यासोबत क्लियर नाही केल्या अजून गोष्टी त्याने प्रयत्न केला तो. पण विश्वासाला तडा गेला ना तर थोडा वेळ जातो. पुढे काय होणार मला माहिती नाही. पण गोष्टी क्लियर नाही झाल्या.  आता अजूनही खरच कळत नाहीय की कुणावर विश्वास ठेवावा. माझी जशी प्रतिक्रिया होती तशी त्याचीही प्रतिक्रिया होती त्यावर. सगळ्यांना मोकळीक आहे ती व्यक्त करण्याचा त्याने तशी केली आणि मी अशी व्यक्त केली.”

याशिवाय बिग बॉस मराठीच्या घरात राहणं खूप कठिण असल्याचं तिने सांगितलं. “असं वाटतं की तिथे जणू तुमचा प्रत्येक श्वास नियंत्रित केला जातो” असही ती म्हटलीय.

Recommended

Loading...
Share