By  
on  

PeepingMoon Exclusive : “तो सतत मला इतरांबद्दल सांगायचा…”, सविता मालपेकरांनी सांगितली किरण मानेंची सेटवरील ती वागणुक

‘मुलगी झाली हो’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारे कलाकार किरण माने यांना त्यांच्या चूकीच्या वर्तणुकीमुळे काढण्यात आलं. ही मालिका प्रसारित होत असलेल्या वाहिनीने काही दिवसांपूर्वी हे कारण स्पष्ट केलय. मात्र आपल्या राजकीय भूमिकेमुळे वाहिनीने मालिकेतून काढून टाकल्याचा आरोप किरण माने गेले काही दिवस करत आहेत. या सगळ्यात मालिकेतील काही कलाकारही किरण माने यांची वर्तणुक चूकीची असल्याचं सांगत आहेत. या मालिकेत किरण माने साकारत असलेल्या विलास पाटीलच्या आईची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांच्याशी पिपींगमून मराठीने संवाद साधलाय. यावेळी त्यांनी किरण माने यांची सेटवरील वागणूक कशी होती ते सांगितलं. शिवाय किरण माने यांनी सविता यांच्याविषयी नुकत्याच केलेल्या पोस्टवरही त्यांनी प्रकाश टाकलाय.


सविता मालपेकर म्हणाल्या की, “तो माझ्या वाट्याला कधी तसा गेलाच नाही. पण तो सतत मला इतरांबद्दल सांगायचा की, तुझ्याबद्दल असं प्रॉडक्शनमध्ये काहीतरी सुरु आहे. तुझा रोल कट करत आहेत वैगेरे. तेव्हा मी त्याला सांगितलं होतं की अशा गोष्टी मला सांगू नकोस.मुलगा आणि आई अशा भूमिके जेव्हा काम करायचं असतं तेव्हा त्या भूमिकेसाठी निर्माते पैसे देत असतो.  तेव्हा मी बाकीच्या गोष्टींचा विचार कशासाठी करु. माझ्यासाठी तो किरण माने नसतो तेव्हा तो माझा ईलास असतो. तुम्ही सेटवर जेव्हा समोरासमोर येतात तेव्हा सगळं विसरून काम करायचं असतं. मीही त्या कॅरेक्टरमध्ये जाऊन काम करायचे. मात्र जेव्हा माझ्या लक्षात यायला लागलं की याची वागणुक अशी आहे तेव्हा मी त्याच्याशी बोलणं कमी केलं होतं.”


किरण माने यांच्या सेटवरील वागणुकीवर सविता मालपेकर म्हणतात की, “तो सेटवर सतत टॉन्ट मारायचा की, ही मालिका माझ्यामुळे चालतेय मी या मालिकेचा हिरो आहे असं म्हणायचा. याला कसं कळायचं की पुढचे डायलॉग कसे आणि कुणाचे आहेत ते. आत्तापर्यंत आम्ही तर लेखकाला कधीच फोन केला नाही. पण हा फोन करण्यासाठी माझ्या मागे लागला होता. पण ह्याला कसं कळायचं की कोणाच्या वाट्याला काय डायलॉग आहे ते.”
किरण माने यांनी सविता मालपेकरांविषयी केलेल्या फेसबुक पोस्टविषयी सविता मालपेकर सांगतात की, “माझी कसली मजबुरी असणार आहे. त्याला असं वाटतय की माझ्यावर दबाव टाकलाय. माझ्यावर कुणी दबाव टाकेल आणि त्या दबावाखाली मी जाईल अशी मी नाही. मी दबावाखाली येऊन बोलतेय हे कुणालाही पटणार नाही. त्याने तसही म्हटलय की आम्ही पोटार्थी आहोत पण तू कोण आहेस ? तुझं काम गेलय म्हणून तू चिडला आहेस ना.? तू पण तर पोटार्थी आहेस.”


यावेळी बोलताना सविता मालपेकरांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. त्या म्हणतात की, “एका कलाकाराला तर त्याने सांगितलं होतं की तुम्ही माझ्याशी बोलला नाहीत तर मालिकेतून काढण्यात येईल. त्याला आधीच सीन आणि डायलॉग माहिती असायचे. ते कसे कळायचे त्याला...?”
किरण माने यांच्या राजकीय भूमिकेमुळे आणि त्यांच्या पोस्टमुळे त्यांना काढण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय. यावर सविता मालपेकर म्हणतात की, “कित्येक कलाकार हे राजकारणात आहेत आणि त्यांची भूमिका सोशल मिडीयावर मांडतात पण यावरुन कुणालाही मालिकेतून काढलय असं कधी झालय का ? तर नाही. मीही राजकारणात आहे, मी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा मीही चॅनेलला सांगितलं होतं. पण त्या गोष्टीचा परिणाम करियरवर होत नाही.”

त्या पुढे सांगतात की,  “किरण माने हा खूप आधीपासून राजकीय पोस्ट करतोय. जेव्हा त्याला मालिकेत घेण्यात आलं होतं तेव्हा चॅनेलला माहिती असेलच ना. मग तेव्हाच घेतलं नसतं. याआधीच काढलं असतं त्याला. त्याने या प्रकरणात राजकारणाची झालर दिलीय ती अत्यंत चूकीची आहे. आदेश बांदेकर, अमोल कोल्हे, परेश रावल इत्यादी कलाकार राजकारणात आहेत पण त्यांच्या बाबतीत ही गोष्टी नाही झालीय.” 

किरण माने यांनी सविता मालपेकर यांच्यासंदर्भात नुकतीच एक पोस्ट केलीय. ज्यात त्यांनी सविता मालपेकर यांच्याविषयी लिहीत म्हटलं होतं की, “मी लाडानं तुला म्हातारे अशी हाक मारायचो”. यावर सविता मालपेकर म्हणतात की, “जसं आम्ही मालिकेत आई मुलाची भूमिका करतोय जरी ती स्क्रिनवर असेल तरी खऱ्या आयुष्यातही मी त्याच्याकडे तसच पाहत होती. त्याच्या वागणुकीमुळे मीही दुखावली गेलीय. मला असं वाटतं की त्याने कुणाचही नाव घेऊन पोस्ट टाकून नये अन्यथा तक्रार करण्यावाचून पर्याय राहणार नाही. त्याने यापुढे चांगली कामं करावीत असच मला वाटतं.  त्याला चूका नसताना मालिकेतून बाहेर काढलं असतं तर आम्ही त्याच्या पाठीशी उभे राहिलो असतो.” 

Recommended

PeepingMoon Exclusive