PeepingMoon Exclusive : अशी आहे रोहित आणि जुईलीच्या लग्नाची डिजीटल पत्रिका

By  
on  

लोकप्रिय गायक रोहित राऊत आणि गायिका जुईली जोगळेकर ही गोड जोडी लवकरच लग्नबंधनात अडकतेय. येत्या 23 जानेवारी रोजी दोघं विवाहबंधनात अडकणार आहेत. मुळशी येथे हे लग्न पार पडणार असल्याची माहिती पिपींगमून मराठीला मिळालीय. एवढच नाही तर रोहित आणि जुईलीच्या लग्नाची डिजीटल पत्रिका देखील पिपींगमून मराठीला मिळालीय. 


23 जानेवारी रोजी सकाळी रोहित आणि जुईलीच्या लग्नाचा मुहूर्त आहे. तर मुळशी येथील एका वाड्यात हे लग्न पार पडणार आहे.

यावेळी रोहित आणि जुईलीचा परिवार आणि काही मोजक्याच मित्रमंडळींच्या उपस्थितीत हे लग्न पार पडेल. नुकतेच रोहित आणि जुईलीचे लग्नाआधीचे विधी पार पडले आहेत.

रोहित आणि जुईली यांच्यी ओळख जवळपास 12 वर्षांपूर्वी झाली होती. त्यानंतर दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं होतं. सिंगीग स्टार या रिएलिटी शोमध्ये दोघांनी एकत्र सहभाग घेतला होता. 

 

 

Recommended

Loading...
Share