By  
on  

PeepingMoon Exclusive : मालिकेतून काढून टाकल्यानंतर किरण मानेंची या चित्रपटात वर्णी

'मुलगी झाली हो' या मालिकेतून चूकीच्या वर्तणुकीच्या कारणामुळे अभिनेते किरण माने यांना काढण्यात आलं. मात्र हे कारण खोटे असून राजकीय भूमिकेच्या कारणामुळे काढून टाकण्यात आल्याचा आरोप किरण माने यांनी केला आहे. हा लढा पुढे असाच सुरु ठेवणार असल्याचं किरण माने यांनी पिपींगमून मराठीशी बोलताना सांगितलं. शिवाय सध्या भरपुर काम मिळाल्याचही ते सांगतात. मालिकेतून काढल्यानंतर 'रावरंभा' या चित्रपटासाठी विचारणा झाली असून सध्या किरण माने या चित्रपटासाठी चित्रीकरण करत आहेत.

ते सांगतात की, "मला खासगीत दोघांनी कामासाठी विचारणा केली आहे. तर एका प्रॉडक्शनने जाहीर केलं की पुढच्या सिनेमात लीड रोलमध्ये किरण माने असतील. रावरंभा नावाच्या सिनेमात मला छान रोल मिळाला आहे. त्या सिनेमाचं चित्रीकरण मी सध्या करतोय. छान सिनेमा मिळालाय. संजय जाधव सिनेमॅटोग्राफर आहेत तर अनुप जगदाळे दिग्दर्शक आहेत. कुशल बद्रिके, अपुर्वा नेमळेकर हे सगळे मिळून सध्या चित्रीकरण करतोय. भूमिका रिव्हील करता येणार नाही. जी विचारधारा मी मांडतोय त्या विचारधारेला बळकटी देणारी ही भूमिका आहे. मला ऑफर येत आहेत. काम भरपुर आहे सध्या माझ्याकडे. तर मला काम मिळत नाही असं कुणाला वाटत असेल तर चूकीचं आहे. मला आता फक्त न्याय मिळवायचाय."

रावरंभा या चित्रपटातून ऐतिहासिक प्रेमकहाणी समोर येणार आहे. या चित्रपटात अनेक कलाकार झळकणार असून आता त्यात किरण माने यांचीही वर्णी लागली आहे. 

महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपावर किरण माने म्हणतात की, "तुम्ही अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर गदा आणण्यासाठी काढून टाकलय. आधीही माझ्या पोस्ट असायच्या पण नुकत्याच केलेल्या पोस्टनंतर हे सगळं सुरु झालं. इतक्या वर्षात पहिल्यांदा चॅनेलच्या पेजवर जाऊन मला काढण्याचं कॅम्पेन आणि ट्रोलिंग सुरु करण्यात आलं. मी खूप आधीपासून पोस्ट करतोय पण असं ट्रोलिंग पहिल्यांदा झालं आणि तेही त्या विशिष्ट पोस्टमुळे. त्यानंतर लगेच चार दिवसांत मला काढण्यात आलं. तर यात कुढेतरी राजकीय हस्तक्षेप आहे. चॅनेल आणि प्रॉडक्शन हाऊस माझ्या समोर यायला तयार नाही. महिलांशी गैरवर्तन केलं होतं तर माझ्या समोर यायला पाहिजे होतं त्यांनी. इतका मोठा गंभीर आरोप केलाय त्यांनी."

 

Recommended

PeepingMoon Exclusive