By  
on  

PeepingMoon Exclusive : “माझ्या परिवाराच्या अश्रुंना न्याय मिळवून देणार” महिलांंशी गैरवर्तणुकीच्या आरोपांवर किरणे माने म्हटले.. 

‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून अभिनेते किरण माने यांना काढण्यात आलं. त्यानंतर महिलांशी गैरवर्तणुकीचं कारण त्यांनी सांगितलं. मात्र सोशल मिडीयावरील राजकीय भूमिकेमुळे काढण्यात आल्याचा किरण माने यांना आरोप आहे. या सगळ्या प्रकरणात महिलांशी गैरवर्तणुकीच्या आरोपावर किरण माने पिपींगमून मराठीशी बोलताना व्यक्त झाले. हे आरोप गंभीर असल्याचं सांगत ते सत्य समोर आणण्यासाठी हा लढा पुढे सुरु ठेवणार असल्याचं म्हटलय. 


किरण माने म्हणतात की, “मध्येच वेगळा मुद्दा काढला त्यांनी महिलांशी गैरवर्तनाचा. हे मला जरा गंभीर वाटलं. की हे माझ्या आयुष्यात कधीच घडलं नाही. वागणुक आणि गैरवर्तन हे शब्द फार मोठे आहेत. यावरुन असं वाटलं की महिलांशी असभ्य वागला की काय. मात्र जेव्हा मिडीया सेटवर गेली तेव्हा महिलांनी टाँटिंग करत होता, स्वत:ला हिरो समजत होता, अतिशहाणा वागत होता, या शाळेतल्या तक्रारी सांगितल्या. त्यांनी असं म्हणायला पाहिजे होतं की सहकलाकारांशी गैरवर्तन केलं होतं म्हणून. महिलांचं नाव घेऊन अतिशय घाणेरडा प्रयत्न प्रॉडक्शन हाऊसने केलाय. मात्र काही महिला कलाकार स्वत: समोर आल्या आणि त्यांनी माझ्या बाजूने मुद्दा मांडला. काहींना तर मी वडिलांसमान आहे. प्रॉडक्शन हाऊस आणि चॅनेलशी पंगा कोण घेणार तरीही काही महिला कलाकार समोर आल्या. चॅनेल किंवा प्रॉडक्शन हाऊसने कोणतीच शहानीशा केली नाही आणि हे आरोप केले आहेत.”


चॅनेलने केलेल्या आरोपामुळे बदनामी झाल्याचही किरण माने म्हटले की “महिलांशी गैरवर्तनाच्या आरोपामुळे ही जी बदनामी झालीय. त्यामुळे माझ्या परिवाराचं काय झालं असेल ?, माझ्या पत्निचं काय झालं असेल ? आईवडील, मुलगी, सासु-सासरे इतर परिवार त्यांच्या अश्रूंना न्याय मिळवून देणारेय. माझा जीव गेला तरी चालेल त्यांना ज्या वेदना झाल्या त्याला न्याय मिळवून देणार. कितीही मोठी यंत्रणा असेल मी समोर बसून जाब विचारणार. त्यांना समोर आणण्यासाठी मी प्रयत्न करणार, सत्य समोर आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.”
या प्रकरणात त्यांची बाजू मांडताना किरण मानेंनी राजकीय पोस्टमुळेच मालिकेतून काढून टाकल्याचा आरोप केलाय. ते म्हणतात की, “राजकीय पोस्टमुळेच हे झालेलं आहे. पहिले तीन दिवस वाहिनीकडून काहीही उत्तर आलेलं नव्हतं. मात्र मिडीयाने हे प्रकरण उचलुन धरलं त्यानंतर चॅनेलचं स्टेटमेंट आलं. त्याच्याआधीच्या सगळ्या घटना त्या गोष्टीला पुरक होत्या. राजकीय पोस्ट झाल्या, एका विशिष्ट विचारधारेच्या लोकांनी चॅनेलच्या पेजवर कॅम्पेन केलं की त्याला काढून टाका म्हणून. बऱ्याच पोस्ट आल्या की याला लवकर काढून टाकणार आहेत. त्याच तीन दिवसांनंतर मला काढून टाकलं जातं. कधी पैश्यांसाठी मी भांडलो नाही तर कधी वेळ पाळली नाही असं झालं नाही उलट माझ्यामुळे शूटिंग लवकर उरकलय. मी वाट पाहत होतो की ते काय उत्तर देत आहेत. ते समोर येण्याची वाट पाहत होतो. त्यांनी मला कदाचित शुल्लक समजलं असेल की कोण हा कलाकार. ती यंत्रणा फार मोठी आहे. त्या यंत्रणेविरुद्ध सर्वसामान्य माणसाने उभं राहणं म्हणजे हत्तीपुढे मुंगी उभं राहण्यासारखं आहे. एक मुंगीपण हत्तीला सैरावैरा पळवू शकते. मी चूकलो असेल तर त्यांनी ते सिद्ध करुन दाखवावं तिथे मी माफी मागून माघार घेईन.”


 

Recommended

PeepingMoon Exclusive