By  
on  

PeepingMoon Exclusive : “कायदेशीररित्या सामोरं जाणार...” महेश मांजरेकर यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवर पहिली प्रतिक्रिया

‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ हा महेश मांजरेकर यांचा चित्रपट अडचणीत सापडला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच ट्रेलरमधील दृश्यांवर आक्षेप घेण्यात आले होते. त्यानंतर आता या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर चक्क महेश मांजरेकर यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. या चित्रपटात मुलं आणि महिलांचं आक्षेपार्ह चित्रण केल्याने क्षत्रिय मराठा सेवा संस्थेने ही तक्रार दाखल करत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. या सगळ्या प्रकरणावर महेश मांजरेकर यांनी पिपींगमून मराठीसोबत केलेल्या एक्सक्लुझिव्ह बातचीतमध्ये त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
महेश मांजरेकर म्हणतात की, “काही लोकांना हा चित्रपट आवडला तर काही लोकांना नाही आवडला. या गोष्टीचा मी आदर करतो. पण काही लोकांनी केस वैगेरे केलीय. तर या गोष्टीला मी कायदेशीररित्या सामोरं जाईल. माझा कायदेशीर व्यवस्थेवर विश्वास आहे. ”

या चित्रपटाविषयी सांगताना महेश मांजरेकर म्हणतात की, "जयंत पवारची कथा होती मला आवडली होती त्याला मी खूप आधी विचारलं होतं की याच्यावर तुला काही करता येईल का तर ते म्हणजेच हा सिनेमा. सहा ते सात वर्षे झाली लिहून तयार आहे पण ते असं होतं ना की हा सिनेमा पास होईल का वैगेरे. कठीणच होता तसा हा सिनेमा. हा सिनेमा तसाच करणं गरजेचं होतं. पटकन करायचं म्हणून मग आम्हाला एक निर्माता मिळालाच. त्यावेळी जयंत होता पण त्याची प्रकृती ठीक नव्हती. मला असं वाटत की काही लोकांची किंवा एखाद्या क्लास मधील लोकांची पशु वृत्ती जागी होते. हा चित्रपट करायला सोपा नव्हता, बघायलाही सोपा नाही. पण सगळे प्रोटोकॉल पाळून केलेला सिनेमा आहे. भले त्यात सेक्स जरी असलं तरी सांभाळून केलेला सिनेमा होता. आपल्याला एखादा सिनेमा सिस्टीम मधून काढायचा असतो म्हणून आपण करतो. लोकांना वाटतं की महेश मांजरेकरला त्यातून पैसे मिलाले पण काही मिळत नाही. मी दिग्दर्शित केलेला सिनेमा आहे पण त्याचं बजेट जे होतं ते एकदम तुटपंज होतं. या वृत्तीवर सिनेमा करणं फार गरजेचं होतं. म्हणून हा सिनेमा केला.”

Recommended

PeepingMoon Exclusive