PeepingMoon Exclusive : ”मला मोठ्या स्टारच्या मागे उभं राहण्याचे काम करायचं नाही”, ‘थार’ च्या निमित्ताने जितेंद्र जोशीने व्यक्त केली ही खंत

By  
on  

'थार' या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय. या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रदर्शनाआधीच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलय. अभिनेता अनील कपूर, मुलगा हर्षवर्धन कपूर, अभिनेता जितेंद्र जोशी, फातिमा सना शेख, अक्षय ऑबेरॉय, मुक्ती मोहन हे कलाकार या चित्रपटात झळकणार आहेत. याच चित्रपटाच्या निमित्ताने पिपींगमूनने जितेंद्र जोशीसोबत खास बातचीत केलीय. यावेळी थार या चित्रपटाचा भाग झाल्याने आनंदी असल्याचं जितेंद्र यावेळी म्हटलाय. 
या चित्रपटाविषयी सांगताना जितेंद्र जोशीने एक खंत व्यक्त केली आहे. हिंदीतील अनेक चित्रपटांसाठी काही कारणांमुळे नकार द्यावे लागल्याचं जितेंद्र जोशी सांगतो. “मला कोणत्या मोठ्या स्टारच्या मागे फक्त उभं राहायचं काम करायचं नाहीय. मला असे अनेक प्रोजेक्ट येत असतात ज्यांना मी नकार दिला आहे. लोकं मला म्हणतात तू वेडा आहेस का. एकदा दिसलास तर तुझं भलं होईल. शिवाय पैसे जास्त मिळू लागतील.  पण मला असं वाटतं की अशाप्रकारच्या चित्रपटांमध्ये जर मी पूर्ण चित्रपटभर दिसलो तरी इतका फायदा होणार नाही जेवढा मी थार सारख्या चित्रपटात एक सीन करुन होईल. मला लोकांच्या ह्द्यात तर जागा करायची पण मला त्यांच्या मनातही जागा निर्माण करायची आहे. आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा चांगल्या लोकांसोबत काम करेल. ज्या पद्धतिचे चित्रपट पाहायला मला आवडतं त्या पद्धतिच्या चित्रपटात मला काम करायला आवडतं.”


याविषयी सांगताना जितेंद सांगतो की त्याला हिंदीतील एका मोठ्या स्टारच्या मामाच्या भूमिकेसाठीही विचारलं गेलं होतं. जितेंद्र सांगतो की, “मला एका मोठ्या स्टारच्या मामाच्या भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं. मी मामा दिसतो का ? मला असं म्हणायचं की काटेकर चांगला रोल होता, त्यापेक्षा काही वेगळं करायचं. एकच आयुष्य मिळालय. मी थांबलोय अशा पद्धतिच्या वेगळ्या कामासाठी. सेक्रेड गेम्स येऊन किती वर्षे झाली ? त्यानंतर असं काम आलं नाही, पण ‘थार’ मला सेक्रेड गेम्समुळेच मिळालीय असं वाटतं. या चित्रपटातील प्रत्येक पात्रात विविध पैलू आहेत.”
थार या चित्रपटाची कथा, पटकथा, स्क्रिनप्ले आणि भूमिका आवडली असल्याने जितेंद्रने हा चित्रपट केल्याचं तो सांगतो. शिवाय या चित्रपटाच्या निमित्ताने सुपरस्टार अभिनेता अनील कपूर यांच्यासोबत काम करण्याची, त्यांना पाहण्याची संधी मिळाल्याचा आनंद त्याने व्यक्त केलाय. 
 

Recommended

Loading...
Share