Exclusive : बाळासाहेब ठाकरेंपासून प्रेरित आहे अभिनेते महेश मांजरेकरांची ही व्यक्तिरेखा, वाचा सविस्तर

By  
on  

दिग्दर्शक संजय गुप्ता यांचा मल्टीस्टारर सिनेमा ‘मुंबई सागा’ सध्या भलताच चर्चेत आहे. या सिनेमात इम्रान हाश्मी आणि जॉन अब्राहम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मुंबईतील अंडरवर्ल्ड जगतावर भाष्य करणारा हा सिनेमा लवकरच सिनेरसिकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात जॅकी श्रॉफ साकारत असलेली व्यक्तिरेखा आता अभिनेते महेश मांजरेकर साकारतायत हे आपण सर्वच जाणतो. 

पिपींगमून मराठीला एक्सक्ल्युझिव्ह मिळालेल्या वृत्तानुसार, अभिनेते महेश मांजरेकर साकारत असलेली व्यक्तिरेखा ही हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरेंवरुन प्रेरित आहे. महेश साकारत असलेल्या व्यक्तिरेखेची देहबोली त्यांचे संवाद  हे सर्व काही बाळासाहेबांशी मिळतं-जुळतं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या सिनेमामध्ये 80 आणि 90 व्या दशकातील काळ दाखवला जाणार असून बॉम्बे ते मुंबई असा या ड्रीम सिटीचा प्रवास सिनेमात साकारण्यात येणार आहे. या वेळेची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि त्यावेळेची महाराष्ट्रातील परिस्थिती यावर प्रकाशझोत टाकण्यात येणार असल्याने त्यावेळेची बाळासाहेबांची भूमिका महत्त्वाची होती. 

काही दिवसांपूर्वी महेश मांजरेकर यांच्या निवडीनंतर निर्माते  भुषण कुमार म्हणाले होते, ‘महेश एक उत्तम कलाकार आहेत’. त्यांची अभिनय प्रतिभा दिवसेंदिवस अधिकच बहरत आहे.’ बाळासाहेबांच्या रुपात महेश मांजरेकर यांना पाहण्यासाठी चाहते नक्कीच उत्सुक झाले आहेत. 

जॉन अब्राहम, इमरान हाश्मी यांच्यासोबतच सुनील शेट्टी, प्रतीक बब्बर, गुलशन ग्रोवर, रोहित रॉय आणि अमोल गुप्ते हे कलाकार आहेत.त्यामुळे सिनेमाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. ‘मुंबई सागा’  हा सिनेमा पुढील वर्षी 2020च्या जूनमध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. 

Recommended

Loading...
Share