1983मध्ये भारताने पहिल्यांदाच वर्ल्डकपचा विजय अनुभवला. हा ऐतिहासिक क्षण आता रुपेरी पडद्यावर दिग्दर्शक कबिर खान घेऊन येत आहेत. मराठमोळा अभिनेता चिराग पाटील याला त्याचे वडिल आणि प्रसिद्ध क्रिकेटर संदीप पाटील साकारण्याची सुवर्णसंधी या सिनेमाच्या निमित्ताने मिळालीय. नुकताच या सिनेमातील चिरागचा फर्स्ट लुक पोस्टर रिलीज झालाय. आणि याच निमित्ताने पीपिंगमून मराठीशी चिरागने पाटीलने एक्सक्लुझिव्ह बाचतीच केली आहे.
यावेळी चिरागने सिनेमाशी निगडीत अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींविषय़ी सांगीतलं. ’83 द फिल्म’ सिनेमाच्या निमित्ताने चिराग पहिल्यांदाच क्रिकेट खेळला असल्याचं चिरागने सांगीतलं. याविषयी त्याने असं सांगीतलं की, “याआधी क्रिकेट खेळण्याची आणि शिकण्याची संधी कधीच आली नव्हती. जेव्हा वडिलांसोबत क्रिकेट खेळायचो तेव्हा क्रिकेटचं टॅलेंट माझ्यात नसल्याचं त्यांना जाणवलं. टॅलेंट असेल तरचं खेळ असं ते म्हटले होते. मात्र लहानपणापासूनच मला बॉलिवुड सुपरस्टार बनण्याची इच्छा होती. ’83..’ सिनेमासाठी मात्र मी 1 वर्ष भरपुर मेहनत घेतली आणि चांगला सरावही केली. आणि सिनेमा चित्रीत करत असताना वडिलांची स्टाईल माझ्यात असल्याचं कबिर खान यांना जाणवलं. ”
या सिनेमाच्या कास्टिंगविषय़ी सांगताना चिराग आणखी एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करतो की “ प्रशिक्षक बलविंदर सिंह संधू यांनी माझ्याविषयी कबिर खान यांना सांगितलं होतं. रणवीर सिंहच्या कास्टिंगनंतरच माझं कास्टिंग झालं होतं.”
चिराग पाटीलने पीपिंगमूनसोबतच्या एक्सक्लुझिव्ह बातचितमध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट उलगडली आहे. ती म्हणजे, “जिथे 1983 वर्ल्डकप पार पडले त्याच जागी आम्ही चित्रीकरण केलं आहे. शिवाय त्यावेळी जी विजयी वर्ल्डकप ट्रॉफी मिळाली होती तिच ट्रॉफी आम्ही या सिनेमात वापरली आहे. त्या ट्रॉफीला हात लावणं ही फार मोठी गोष्ट होती. हा सिनेमा केल्यानंतर त्या विजयाचं महत्त्वं आणखी वाढलं असून वडिलांसाठीचाही आदर आणखी वाढला आहे.”
प्रसिद्ध क्रिकेटर संदीप पाटील यांचा मुलगा असल्याने चिरागला या सिनेमात पाहणं औत्सुक्याचं असेल. मात्र सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान एकही दिवस संदीप पाटील चिरागचा सराव किंवा शुटिंग पाहण्यासाठी आले नसल्याचही चिराग बोलला. मात्र फक्त शेवटच्या दिवशी वडिलांनी हजेरी लावली असल्याचं चिराग सांगतो.
‘83 द फिल्म’ हा सिनेमा 10 एप्रिल 2020 रोजी रिलीज होणार असून रणवीर सिंह या सिनेमात कपिल देव यांची भूमिका साकारत आहेत. शिवाय अनेक कलाकारांना या सिनेमात दिग्गज क्रिकेटर साकारण्याची संधी मिळाली आहे.