EXCLUSIVE : तो गर्वाचा क्षण त्याच्यासोबत अनुभवायचा आहे – मानसी नाईक

By  
on  

उत्तम नृत्यांगना म्हणून प्रसिद्ध असलेली मराठी अभिनेत्री मानसी नाईकने तिच्या वाढदिवसालाच प्रेमाची कबुली दिली आहे. मानसी प्रेमात असल्याचं तिने सोशल मिडीयाच्या माध्यमातून सांगीतलं आणि आपल्या प्रियकर आंतरराष्ट्रीय बॉक्सर प्रदीप खरेरासोबत सोबतचा फोटोही पोस्ट केला. त्याच्यासोबतरिलेशनमध्ये असल्याचं तिने सांगीतलं.

मात्र पिपींगमून मराठीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत तिने तिच्या रिलेशनशीपविषयीच्या काही गोष्टी शेयर केल्या आहेत. यावेळी एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून प्रदीपशी ओळख झाल्याचं तिने सांगीतलं. 
मानसीला मांजरी खुप आवडतात आणि तिच्या घरीही बऱ्याच मांजरी आहेत. मात्र प्रदीपच्या प्राणीप्रेमाविषयी सांगताना मानसी म्हटली की, “ज्या ठिकाणाहून तो आला आहे तिथे शेती वैगेरे आहे. तिथे त्यांची गाई- गुरं पण आहेत. त्यामुळे त्याला प्राण्यांची आवड आहे. पण माजरांची आवड त्याला माझ्यामुळे लागली आहे. मीच त्याला मांजरांची आवड लावली आहे.”

प्रदीपची कोणती गोष्ट मानसीला आवडते?  याविषयीही तिने सांगीतलं. मानसी म्हणते की, “त्याच्या बऱ्याच गोष्टी मला आवडतात. तो त्याच्या खेळाशी ज्या पद्धतीने समर्पित आहे ती गोष्ट मला जास्त आवडते. तो एक देशभक्त आहे. जेव्हा एखादी बॉक्सिंग स्पर्धा तो जिंकतो आणि जेव्हा भारताचा झेंडा तो त्याच्या हातात घेतो ती अतिशय गर्वाची गोष्ट असते. भारतासाठी खेळणारा कुणीतरी असा मुलगा जो खरचं भारतावर प्रेम करतो. आणि मला हे तो नेहमी सांगत असतो की तेव्हा ते वातावरण खरचं खुप वेगळं असतं. आणि भारताचा झेंडा तिकडे फडकवणं खुप गर्वाचं असतं.”

हे सांगत असताना मानसीने तिची एक इच्छाही व्यक्त केली आहे. मानसी म्हणते की, “माझी इच्छा आहे की तो जेव्हा केव्हा भारतासाठी खेळेल किंवा जिंकेल तिकडे मला उपस्थित राहायचं आहे. तो गर्वाचा क्षण त्याच्यासोबत अनुभवायचा आहे. आणि लवकरच मी त्याचा एखादा बॉक्सिंग सामनाही अनुभवेल.”

लग्नाविषयी अद्याप काही ठरवलं नसल्याचं मानसी यावेळी म्हटली आहे.
 

Recommended

Loading...
Share