By  
on  

 Exclusive : या रिएलिटी शोच्या सेटवर कलाकारांना कोरोनाची लागण, तरीही करत आहेत चित्रीकरण ?

‘सिंगीग स्टार’ या नव्या रिएलिटी कार्यक्रमाला नुकतीच सुरु झाली आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक-गायिकांसह अनेक प्रसिद्ध अभिनेता आणि अभिनेत्रीही त्यांचं गायनकौशल्य सादर करताना दिसत आहेत. सोनी मराठीवरील या कार्यक्रमाचा आनंद प्रेक्षक लुटत असून प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळत आहे.
मात्र एकीकडे कोरोनाग्रस्त परिस्थितीत विविध मालिका आणि चित्रीकरणाच्या सेटवर सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध नियमांचं पालन केलं जातय तर याउलट या कार्यक्रमाच्या सेटवर वेगळचं चित्र आहे.
पिपीगंमून मराठीला मिळालेल्या सुत्रांच्या माहितीनुसार 'सिंगीग स्टार' या रिएलिटी शोच्या सेटवर काही कलाकारांना, क्रू मेम्बर्सना कोरोनाची लागण झालेली असताना देखील या कार्यक्रमाचं चित्रीकरण सुरु आहे.
यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार जुईली जोगळेकर, रोहीत राऊत, अभिजीत केळकर, अर्चना निपाणकर, अजीत परब, पौर्णिमा डे या कलाकारांसह, सत्तू दादा (मेकअप आर्टिस्ट) आणि तीन क्रू मेम्बर्सना कोरोनाची लागण झाल्याची सुत्रांची माहिती आहे. एवढ्या कलाकारांना कोरोनाचा संसर्ग झालेला असतानाही चित्रीकरण बंद करण्यात आलेलं नाही असं म्हटलं जातय. 

मात्र असं असतानाही या कार्यक्रमाचं चित्रीकरण थांबवलेलं नसल्याचं समोर येत आहे. मात्र जर या कार्यक्रमाच्या सेटवर कोरोनाचा फैलाव इतक्या मोठ्या प्रमाणात झाला असेल तर वाहिनी यावर काय उपाय करणार ?    हे समोर येणं गरजेचं आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive