By  
on  

Exclusive:अनिकेत विश्वासराव आणि स्नेहा चव्हाण यांचा साखरपुडा; डिसेंबरमध्ये आहे लग्न

मराठी सिनेसृष्टीतील मोस्ट एलिजिबेल बॅचलर म्हणून ओळखला जाणारा अभिनेता अनिकेत विश्वासराव याचा नुकताच साखरपुडा झाल्याची बातमी एक्सक्ल्युझिव्हरित्या पिपिंगमून मराठीच्या हाती लागली आहे. ‘लाल इश्क’ या संजय लिला भन्साळी यांच्या मराठी सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री स्नेहा चव्हाण याच्यासोबत अनिकेतचा साखरपुडा  नुकताच पुण्यात पार पडला.

महत्त्वाचं म्हणजे हे रिअल लाईफ कपल अनिकेत विश्वासराव आणि स्नेहा चव्हाण यांची प्रमुख भूमिका असलेला पहिला सिनेमा ‘हद्यात समथिंग समथिंग’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या साखरपुड्याच्या वृत्ताला दुजोरा देत स्नेहा मराठी पिपिंगमून डॉट कॉमशी बोलताना म्हणाली, “ हो,माझा आणि अनिकेतचा 5 ऑगस्ट रोजी पुण्यात साखरपुडा पार पडला. या खास सोहळ्याला फक्त नातेवाईक आणि जवळचे मित्र-मैत्रिणी उपस्थितीत होते. आमचं लग्न डिसेंबरमध्ये होणार आहे. साखरपुड्याचा सोहळा हा फारच खासगी पध्दतीने पार पडला.”

दोघांच्या नात्याविषयी विचारले असता स्नेहा हसून सांगते, “अजून तरी या याबबात मी तुम्हाला आणखी काही माहिती देऊ शकत नाही. पण तुम्हाला लवकरच सांगेन. आमचं हे अरेंज मॅरेज आहे. एकाच इंडस्ट्रीत आणि सहकलाकार असल्याने हे लव्ह मॅरेज आहे, की काय असा गैरसमज होऊ शकतो. पण तसं काही नाही. आमच्या कुटुंबियांनी या लग्नासाठी पुढाकार घेतला आहे. सध्या तरी आम्ही दोघं आपापल्या प्रोजेक्टसमध्ये बिझी आहोत, ‘हद्यात समथिंग समथिंग’ हा आमचा सिनेमा येत्या 5 ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. डिसेंबरमध्ये आमचा लग्नसोहळा पार पडेल."

 

मराठी पिपिंगमून डॉट कॉमतर्फे अनिकेत विश्वासराव आणि स्नेहा चव्हाण यांना साखरपुड्यानिमित्त आणि आयुष्यातील नवीन वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा!

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive