By  
on  

Exclusive: काजोल आणि अमिताभ झळकणार एकत्र

आपल्या दमदार अभिनयाने सिनेसृष्टी गाजवणारी अभिनेत्री काजोल हिची प्रमुख भूमिका असलेला 'हेलिकॉप्टर ईला' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात ती एका विभक्त झालेल्या आईच्या भूमिकेत असल्याचे आपल्याला ट्रेलरवरुन समजते. मुलासाठी अविरत झटणा-या एका आईची ही कहाणी आहे. पण या सिनेमाबाबतची आणखी एक महत्त्वाची बातमी नुकतीच पिपींगमून डॉट कॉमच्या हाती लागली आहे, ती म्हणजे महानायक अमिताभ बच्चन या सिनेमात काजोलबरोबर एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत.

पिपींगमूनला मिळालेल्या माहितीनुसार, 'हेलिकॉप्टर ईला'मध्ये अमिताभ बच्चन झळकणार असून ते आपल्या ख-या आयुष्याप्रमाणेच यात अभिनेत्याच्या भूमिकेत दिसतील. सूत्रांच्या माहितीनुसार काजोलच्या या सिनेमात ते पाहुणे कलाकार म्हणून दिसणार आहेत. पण याबाबतची अधिक माहिती अद्यापतरी समोर आलेली नाही. यापूर्वी दोघेही 'कभी खुशी कभी गम' या सिनेमात एकत्र दिसले होते. काजोल हिने अमिताभ बच्चन यांच्या सूनेची भूमिका यात साकारली होती.

‘हेलीकॉप्टर ईला’बद्दल आणखी बोलायचं तर, ट्रेलरमधूनच सिनेमाबाबतच्या अनेक गोष्टी उलगडल्या आहेत. एक आई आणि तिच्या मुलाची ही कथा आहे. अतिप्रेम करण्याच्या नादात ती त्याच्यावर नकळत खुप दबाव टाकू लागते. पण पुढे नेमकं काय घडतं, हे सिनेमात पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.

‘हेलीकॉप्टर ईला’ ही एक मॉर्डन आई आणि तिच्या एकुलत्या एक मुलाची हटके कहाणी आहे, जी आपल्या प्रत्येकाच्य आयुष्याच्या फार जवळची वाटते. जबाबदार आईबरोबरच एका महत्वाकांक्षी गायिकेच्या रुपात काजोलला या सिनेमात पाहता येईल. मितेश शाह द्वारा लिखित अजय देवगण आणि पेन इंडियाद्वारा निर्मित ‘हेलीकॉप्टर ईला’ हा सिनेमा येत्या 7 सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive