By  
on  

Exclusive: सलमान नसला तरी हे राहणार प्रियंकाच्या डिनर पार्टीला उपस्थित

देसी गर्ल प्रियंका चोप्रा सध्या भलतीच चर्चेत आहे. बॉयफ्रेंड निक जोनसचे आई-वडिल तिला भेटण्यासाठी भारतात आले आहेत. म्हणूनच त्यांच्यासाठी खास प्रियंका आणि तिची आई मधू चोप्रा यांनी खास शानदार पार्टीचे आयोजन केलं आहे. या पार्टीतच निक जोनस आणि प्रियंकाच्या साखरपुड्याची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

तुम्हाला माहितच आहे, प्रियंकाने सलमान खान स्टारर 'भारत' सोडला आणि ती आता आपल्या नवीन नात्याची सुरूवात लवकरच करणार आहे. म्हणूनच बहुतेक निकचे आईवडील भारतात येताना होणा-या सुनबाईंसाठी जगप्रसिध्द टिफनी ब्रॅंडमधून मोठी भेटववस्तू घेऊन आले आहेत. त्यामुळेच पार्टीत मित्रपरिवार आणि नातेवाईकांच्या उपस्थित प्रियंका-निकचा साखरपुडा होणार असल्याचे बॉलिवूडचे सूत्र सांगत आहेत.

महत्त्वाचं म्हणजे प्रियंकाच्या या खास पार्टीत निक कुटुंबियांसोबतच तिचे बॉलिवूडमधील जवळचे मित्र वर्णी लावणार असल्याचे बोलले जात आहे. प्रियंका सध्या शुटींग करत असलेल्या सोनाली बोस यांच्या ‘स्काय इज पिंक’ची संपूर्ण टीमसह फरहान अख्तर आणि झायरा वसीम यांना तिने खास आमंत्रित करणार असल्याचे सांगितले जात आहे. तसंच या सिनेमाचे निर्माते रॉनी स्क्रूवाला आणि निर्माते सिध्दार्थ रॉय कपूरसुध्दा या डिनर पार्टीला उपस्थित राहणार असल्याचे समजते.

बॉलिवूडसह सर्वच चाहत्यांना आता प्रियंका-निकच्या साखरपुड्याच्या अधिकृत घोषणेची उत्सुकता लागली आहे.

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive