Exclusive: पॉर्न सिनेमांप्रकरणी शिल्पाला काहीच माहिती नाही, राज कुंद्रा यांचा जबाब

By  
on  

पॉर्न सिनेमाची निर्मिती केल्या प्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला सोमवारी मुंबई पोलिसांनी अटक केली. पॉर्न सिनेमे बनवून मोबाईल अ‍ॅप्लीकेशनद्वारे ते रिलीज केल्याचा आरोप राजवर आहे. राज कुंद्राला23 जुलैपर्यंत पोलिस रिमांडमध्ये पाठवलं जाणार आहे.

 

या प्रकरणाला आता नवं वळण आलं आहे. पॉर्न सिनेमांप्रकरणी शिल्पाला काहीच माहिती नसल्याचा जबाब राजने दिला आहे. राज OTT साठी सिरीज बनवत असल्याचं तिला माहिती होतं. आतापर्यंत या प्रकरणात सात मुली समोर आल्या आहेत. काही मुलींनी लिखीत स्वरुपात याबाबतची माहिती दिली आहे. या प्रकरणात आणखी काहींना अटक होण्याची शक्यता आहे.

Recommended

Loading...
Share