By  
on  

Exclusive : बोहल्यावर चढल्यानंतर दिपीका करणार एक्स बॉयफ्रेंडसोबत सिनेमा

बॉलिवूड लव्हबर्डस दिपीका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. बॉलिवूडसोबतच चाहत्यांनासुध्दा त्यांच्या लग्नसोहळ्याचे क्षण पाहण्याची प्रचंड आतुरता लागलीय. यांच्या लगीनघाईच्या चर्चांनी दिवसेंदिवस जोर धरला असतानाच आता एक नवीन बातमी येऊन धडकली आहे.

पदमावत सिनेमात राणी पदमावतीची अप्रतिम भूमिका साकारुन सर्वांची मनं जिंकल्यानंतर दिपीका अद्यापपर्यंत कुठल्याच सिनेमात झळकली नाही किंवा कोणत्या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवातसुध्दा तिने केलेली नाही. मध्यंतरी तिला पाठीच्या दुखण्याचा त्रास असल्याचं बोललं जात होतं. सर्वांनाच दिपीकाच्या आगामी सिनेमाची उत्सुकता आहे. म्हणूनच पिपींगमून तुमच्यासाठी एक खास बातमी घेऊन आले आहे. सूत्रांनी आम्हाला दिलेल्या माहितीनुसार रणबीर कपूर आणि अजय देवगण स्टारर ‘ड्रामेडी’ सिनेमासाठी दिपीका पादुकोणचं नाव फायनल करण्यात आलं आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा लवरंजन सांभाळत आहेत. महत्त्वाचं म्हणजे दिपीकाने हा सिनेमा साईनसुध्दा केला असून पुढीलवर्षी या सिनेमाच्या शुटींगला सुरुवात होईल. म्हणजेच लग्नानंतर दिपीकाचा हा पहिला सिनेमा ठरेल. दिपीका येत्या नोव्हेंबरमध्ये अभिनेता रणवीर सिंहसोबत लग्नगाठ बांधणार आहे.

रणबीर कपूर आणि दिपीका पादुकोण या जुन्या बॉलिवूड लव्हबर्ड्सचा हा चौथा सिनेमा असेल. रणबीर- दिपीका या जोडीने आत्तापर्यंत ‘बचना ऐ हसीनो’, ’ये जवानी हैं दीवनी’ आणि ‘तमाशा’ या सिनेमांद्वारे प्रेक्षकांवर जादू केली आहे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive