By  
on  

Exclusive: नवाजुद्दीन सिध्दीकी करणार का टॉपच्या अभिनेत्रीसोबत रोमॅन्स

सॅक्रेड गेम्सच्या यशानंतर बॉलिवूडमधील हरहुन्नरी अभिनेता नवाजुद्दीन सिध्दीकीचा भाव भलताच वधारला आहे. त्यामुळे नवाजसुध्दा खुशीतच वावरताना दिसतोय. तो आता आपल्या बॉलिवूड कारकिर्दीत चांगलाच स्थिरावला आहे. म्हणूनच त्याने एक निर्णय घेतला आहे. त्याचं म्हणणं आहे की तो फक्त सोलो आणि सोलो सिनेमेच साईन करणार, ज्यात त्याची प्रमुख भूमिका असेल.

काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेला नवाजचा सिनेमा ‘बाबूमोशाय बंदूकबाज’चे दिग्दर्शक कुशान नंदी यांच्या आगामी रोमॅण्टिक सिनेमात प्रमुख भूमिका नवाजच साकारत आहे. तर महत्त्वाचं म्हणजे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिग्दर्शक कुशान हे नवाजसोबत नायिका म्हणून एका टॉपच्या अभिनेत्रीचा विचार करत आहेत. पण ती टॉपची अभिनेत्री कोण याबाबतचा उलगडा अद्याप तरी झालेला नाही.

‘बाबूमोशाय बंदूकबाज’ हा प्रमुख भूमिका असलेला अभिनेता नवाजुद्दीन सिध्दीकीचा पहिला सुपरहिट सिनेमा ठरला. कदाचित याच कारणामुळे नवाजने कुशानच्या या रोमॅण्टिक सिनेमाची ऑफर लगेचच स्विकारली आहे. पण या सिनेमासाठी नवाजला तारखांच्या अडचणी येऊ शकतात, कारण सध्या तो अनेक प्रोजेक्ट्सवर एकाचवेळी काम करतोय.

महत्त्वाचं म्हणजे सध्या नवाज आपला महत्त्वकांक्षी सिनेमा ‘मंटो’चे जोरदार प्रमोशन करताना पाहायला मिळतोय. या सिनेमात तो साहिर लुधियानवी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा नंदिता दासने सांभाळली आहे. तसंच या सिनेमांव्यतिरिक्त नवाजकडे शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेबांचा बायोपिक ‘ठाकरे’ आहे. त्यानंतर तो अथिया शेट्टीसोबत ‘मोतीचूर चकनाचूर’ या कॉमेडी सिनेमात काम करतोय.

प्रेक्षकांना आता नवाजला रोमॅण्टीक सिनेमात नायकाच्या भूमिकेत पाहण्याची प्रचंड आतुरता लागून राहिली आहे.

 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive