Confirmed: आमिर खान साकारणार गुलशन कुमार; लवकरच येतोय बायोपिक

By  
on  

ठग्स ऑफ हिंदुस्थान या यशराज फिल्मसच्या बिग बजेट सिनेमानंतर मि. परफेक्शनिस्ट कोणता प्रोजेक्ट हाती घेणार याबाबत ब-याच चर्चा रंगल्या.आमिर आध्यात्मिक गुरु ओशोंचा बायोपिक करणार याबातसुदध्दा प्रसार माध्यमांमध्ये ब-याच बातम्या येत होत्या आणि आमिरनेसुध्दा यासाठी अनेक लूक टेस्ट दिले होते, असे बोलले जाते. पण आता मागील काही आठवड्यांपासून आमिर खान संगीत सम्राट गुलशन कुमार यांचा बायोपिक करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. पण पिपींगमून डॉट कॉमला मिळालेल्या माहितीनुसार आमिर ठग्स ऑफ हिंदुस्थाननंतर गुलशन कुमार यांचा बायोपिकचा मोगुल प्रोजेक्टच हाती घेणार असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झालं आहे. त्याने स्क्रिप्टसुध्दा वाचून पूर्ण केल्याची माहिती मिळतेय.

आमिर आणि सुभाष कपूर आतापर्यंत चार विकेंडला या बायोपिकच्या स्क्रिप्टवर खंडाळ्यातील त्याच्या बंगल्यात चर्चेसाठी भेटले होते. या स्क्रिप्टमधील काही धार्मिक भागाबद्दल आमिरला थोडासा आक्षेप असल्याचं बोललं जात आहे. सुभाष कपूर हेच गुलशन कुमार यांच्या बायोपिकचे लेखन आणि दिग्दर्शन करत आहेत. तसंच महत्त्वाचं म्हणजे टी-सिरीजबरोबरच आमिरसुध्दा या सिनेमाची निर्मिती करणार आहे.

टी-सिरीजचे चेअरमन आणि गुलशन कुमार यांचे सुपुत्र भूषण कुमार हे स्वत: या बायोपिकच्या बारीक-सारीकव गोष्टींकडे लक्ष देत आहेत. या प्रोजेक्टमध्ये फक्त वास्विक घटनाच दाखविण्याचा  प्रयत्न करण्यात येत आहे. तसच त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग सिनेमात उभे करण्यात येणार आहेत.

 

गुलशन कुमार यांच्या पायरसीपासून अनुराधा पौडवाल यांच्यापर्यंतच्या सर्व बाजूंचा या बायोपिकमध्ये समावेश होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे 1997 मध्ये गुलशन कुमार यांची हत्या नदीम सैफीने अंडरवर्ल्डच्या साहाय्याने केल्याचा आरोपसुध्दा या स्क्रिप्टमध्ये आहे.

सध्या मोगुल नाव ठेवण्यात आलेल्या या गुलशन कुमार यांचा हा बायोपिक पुढील वर्षी मार्चपर्यंत फ्लोरवर जाणार असून तसंच या सिनेमाचं तीन महिन्याचं शूटींग शेड्यूलही प्लॅन करण्यात आलं आहे. या सिनेमाची अधिकृत घोषणा नोव्हेंबरमध्ये करण्यात येईल. महत्त्वाचं म्हणजे या बायोपिकसाठी अक्षय कुमारचं नाव यापूर्वी आघाडीवर होतं,पण अक्षयने या सिनेमाला नकार दिला होता.

सर्वांनाच आता  आमिर खानला गुलशन कुमार यांच्या भूमिकेत पाहण्याची उत्सुकता लागून राहणार आहे.

Recommended

Loading...
Share