By  
on  

‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’च्या प्रदर्शनापूर्वीच आमिर खान घेणार करण जोहरसोबत कॉफी

निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या पॉप्युलर 'कॉफी विथ करण'च्या आगामी सीझनची प्रचंड उत्सुकता आहे. आत्तापर्यंत या शोमध्ये हजेरी लावलेल्या सेलिब्रिटींबाबत खुलासा झाला असून लवकरच या शोमध्ये बॉलिवूडचा मि. परफेक्शनिस्ट आमिर खान उपस्थिती लावणार असल्याचे एक्सक्ल्युझिव्ह वृत्त पिपींगमूनच्या हाती आले आहे.

यंदा खास दिवाळीत आमिर खान करण जोहरसोबत 'कॉफी विथ करण'मध्ये उपस्थित राहणार आहे. करण या शोमध्ये आमिरसोबत दिवाळी साजरी करणार असून महत्त्वाचं म्हणजे या शोमध्ये आमिर एकटाच एन्ट्री करणार आहे. स्टार वर्ल्ड वाहिनीवर कॉफी विथ करणचा हा भाग रविवार 4 नोव्हेंबर रोजी प्रसारित होणार आहे.

यापूर्वीसुध्दा आमिरने करणच्या या पॉप्युलर शोमध्ये उपस्थिती लावली होती. एकदा तो पत्नी किरण रावसोबत आला होता तर एकदा दंगल गर्ल फातिमा शेख आणि सान्या मल्होत्रासोबत पोहचला होता. आमिरसोबतचे करणच्या शोचे हे एपिसोड्स प्रचंड पॉप्युलर आहेत.

‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हा आमिर खानची प्रमुख भूमिका असलेला बिग बजेट सिनेमा 8 नोव्हेंबरला प्रदर्शित होतोय. तर त्याच्याच चार दिवस पूर्वीच आमिर कॉफीमध्ये करणसोबत झळकेल. त्यामुळे आमिर या शोमध्ये कोणते रंजक किस्से सांगणार याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली हे.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive