Exclusive : हृतिक रोशन-टायगर श्रॉफ अभिनीत पुढील सिनेमाचं नाव ‘फायटर्स ऐवजी ‘धूम 4’?

By  
on  

यशराज स्टुडियो सध्या एका मोठ्या प्रोजेक्टच्या तयारीत गुंतला आहे. हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यशराज स्टुडियोजच्या आगामी सिनेमात एकत्र दिसणार आहेत. पण सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या सिनेमाचं टायटल अजून ठरलेलं नाही. यशराज स्टुडियो या सिनेमाला धूम 4 हे टायटल देण्याच्या विचारात असल्याची माहिती पीपिंगमूनला मिळाली आहे.

या सिनेमात वाणी कपूर देखील महत्त्वाच्या भूमिकेत असल्याची माहिती मिळाली आहे. या सिनेमासाठी ‘फायटर्स’ टायटल निवडल्याची चर्चा होती. पण ही अफवा असल्याचं सुत्रांनी म्हटलं आहे. या सिनेमाच्या नावाची निवड या महिना अखेरपर्यंत केली जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस या सिनेमाचं पोस्टर आणि ट्रेलर लाँच केलं जाईल. हा सिनेमा गुरु शिष्यावर बेतला असणार आहे. स्वत:च्या तालमीत शिष्याला तयार करून गादीचा वारसदार निवडण्याची या गुरुची इच्छा असते. पण त्यापुर्वीच गुरुची जागा मिळवण्याचा प्रयत्न शिष्य करतो साधारणपणे असं या सिनेमाचं कथानक असणार आहे. वाणी या सिनेमात दोघांचं लव्ह इंटरेस्ट असणार आहे. जर या सिनेमाचं नाव ‘धूम 4’ नक्की झालं तर अभिषेक बच्चन आणि उदय चोप्रा यांची या सिनेमात काय भूमिका असेल, यासंबंधी विचार केला जात आहे.

 

Recommended

Loading...
Share