By  
on  

Exclusive : दीपिकाही दिसणार ‘83’मध्ये, साकारणार रोमी देव ही व्यक्तिरेखा

‘83’ सिनेमाची चर्चा सुरु झाली तेव्हापासून या सिनेमात कपिल देव अर्थात रणवीर सिंगच्या पत्नीची भूमिका कोण साकारणार याची चर्चा सुरु होती. पण आता या चर्चेवरचा पडदा उठला आहे. या सिनेमात रणवीरची रिअल वाईफच रणवीरची रिल वाईफ बनणार आहे. होय ! हे खरं आहे. पीपिंगमूनला मिळालेल्या माहितीनुसार, दीपिका पदुकोण या सिनेमात कपिल देवच्या पत्नीची म्हणजेच रोमी देवची भूमिका साकारणार आहे. खरं तर या भूमिकेविषयी दीपिका खुप दिवसांपुर्वी विचारलं गेलं होतं. पण मेघना गुलजारच्या ‘छपाक’मध्ये व्यस्त असल्याने तीने याबद्दल निर्णय कळवला नव्हता. पण आता दीपिका या सिनेमात दिसणार आहे. विशेष म्हणजे तिला या सिनेमाच्या को प्रोड्युसरचं क्रेडिटही मिळणार आहे. या दोघांचेही फॅन्स या जोडीला पुन्हा एकदा काम करताना पाहायला उत्सुक झाले आहेत.

विशेष म्हणजे या विश्वकपच्या अंतिम सामन्यावेळी रोमी मैदानात उपस्थित होत्या. पण विंडिजच्या खेळाडूंचा जल्लोष पाहून नाराज झालेल्या रोमी पुन्हा हॉटेलवर गेल्या. पण खेळाची दिशा लवकरच बदलली आणि विजय भारताच्या समोर दिसू लागला त्यावेळी त्यांनी पुन्हा स्टेडियमवर जाण्याचा प्रयत्न केला पण त्यांना जाता आलं नाही. त्यामुळे तिथे असूनही हा सामना रोमी यांना हॉटेलच्या टीव्हीवर पहावा लागला. या सगळ्या घडामोडी कबीर खान ‘83’मधून पडद्यावर मांडणार असल्याचं बोललं जात आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive