अभिनेत्री अमृता सिंह मुलगी सारा अली खानबाबत खुपच प्रोटेक्टिव्ह आहे. सैफ अली खान आणि अमृता सिंहची मुलगी सारा अली खान बॉलिवूड पदार्पणासाठी आता सज्ज झाली असून पदार्पणापूर्वीच तिच्या हातात दोन सिनेमे आहेत. एक आहे ‘केदारनाथ’ ज्यात तिच्या अपोझिट सुशांत सिंह राजपूत आहे. तर दुसरा रणवीर सिंह सोबत ‘सिंबा’ सिनेमात ती झळकतेय.
सध्या बॉलिवूडमध्ये वेगात सुरु असलेल्या #MeToo मोहिमेबद्दल पिपींगमून डॉट कॉमसोबत एक्सक्ल्युझिव्ह बातचित करताना अमृता सिंह म्हणाली, “ मी साराला नेहमीच सांगत आलीय तु जेव्हा काही तुझ्यासमोर चुकीचं होताना पाहत असशील किंवा अनुभवत असशील तर त्वरित त्याविरोधात आवाज उठव. महिलांसोबत असभ्य वागणा-यांसोबत कधीच काम करु नकोस.” अशा प्रकारे आई अमृताने लाडकी लेक सारा अली खानला स्वयंसंरक्षणाचे धडे दिले आहेत.
तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर केलेल्या गैरवर्तवणुकीच्या आरोपानंतर बॉलिवूडमध्ये #MeToo चळवळीने वेग घेतला. याबबात अमृता पुढे सांगते, “ही खुप कौतुकास्पद बाब आहे की आता महिला आपल्या अन्याविरोधात वाज उठवतायत. महिलांसोबत असभ्य वर्तन करणा-या सिनेइंडस्ट्रीतल्या त्या पुरुषांना शिक्षा ही झालीच पाहिजे.’’