Exclusive: व्यस्त दिनक्रमामुळे मुलांसोबतचा सुट्टीचा प्लॅन हृतिक करणार कॅन्सल

By  
on  

बॉलीवूड अॅक्टर हृतिक रोशन दरवर्षी आपली दोन मुलं रेहान आणि रिधान सोबत उन्हाळी सुट्टीमध्ये मजा करतो. गेल्या ५ वर्षांपासून हृतिक आपल्या मुलांना दर उन्हाळी सुट्टीत कुठेतरी फिरायला घेऊन जातो.  परंतु यावर्षी मात्र व्यस्त दिनक्रमातून ह्रतिकला या सुट्टीमध्ये आपल्या मुलांसोबत वेळ घालवता येणार नाही. 

पिपिंगमुनच्या सूत्राने यासंबंधी खुलासा केला की,''हृतिक सध्या टायगर श्रॉफसोबत आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये करत असून सुपर 30 सिनेमाच्या प्रोमोशनमध्ये सुद्धा हृतिक व्यस्त आहेत. त्यामुळे या व्यस्त दिनक्रमातून वेळ न मिळाल्यामुळे ह्रतिकला मुलांसोबतची सुट्टी रद्द करावी लागणार आहे.''

हृतिक सध्या टायगर श्रॉफसोबत आगामी ऍक्शन ऍडव्हेंचर सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. तसेच हृतिकचा 'सुपर 30' हा सिनेमा सुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हृतिकचं आपल्या दोन्ही मुलांवर नितांत प्रेम असून पत्नी सुजैनशी घटस्फोट झाल्यानंतर हृतिकने जास्तीत जास्त वेळ आपल्या मुलांसोबत घालवण्यास प्राधान्य दिलं आहे. 

Recommended

Loading...
Share