Exclusive: बलात्काराचा गुन्हा आणि वसूलीबाबत आदित्य पांचोली म्हणतो, ‘हे तर आधीच प्लॅन केलं आहे’

By  
on  

अभिनेता आदित्य पांचोलीवर मुंबई पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. एका अभिनेत्रीने दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय जबरदस्ती वसूली केल्याचाही आदित्यवर आरोप आहे. पीपिंगमूनने याविषयावर आदित्यला छेडलं असता त्याने हा माझ्याविरुद्ध कट रचला असल्याचं बोलून दाखवलं आहे. 

आदित्य म्हणतो, ‘एफआयआर दाखल केल्याची बातमी खरी आहे. हे सगळं मला माहीत आहे. तपासाला मदत करेन. तपासाअंती हे लक्षात येईल की बलात्कार १३-१४ वर्षांपुर्वी झाला होता की नाही. पण हे सगळं खरं आहे की मला यात अडकवलेलं आहे. तपास झाल्यावर सत्य बाहेर येईलच. पण वसूलीच्या आरोपांविषयी मला काहीच माहिती नाही.

Recommended

Loading...
Share